लोटस सॉफ्टवेर
| उद्योग | software industry |
|---|---|
| स्थापना | 1982 |
| नाव | Lotus Development Corporation |
| याचे नावाने नामकरण | पद्मासन |
| संस्थापक | Mitch Kapor, Jonathan Sachs |
| देश | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| मालक संस्था | आय.बी.एम. |
| पालक संस्था | आय.बी.एम. |
| मुख्यालयाचे स्थान | केंब्रिज |
| उत्पादने | सॉफ्टवेअर |
| अधिकृत संकेतस्थळ | http://www.ibm.com/software/lotus |
लोटस सॉफ्टवेर ही अमेरिकेतील एक संगणक सॉफ्टवेर कंपनी होती. याची स्थापना १९८२ मध्ये मिच कपूर आणि जोनाथन सॅक्स यांनी केली होती. या कंपनीचे मुख्यालय अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील केंब्रिज येथे होते. लोटसने तयार केलेले लोटस १-२-३ हे स्प्रेडशीट सॉफ्टवेर १९८० च्या दशकात कमालीचे लोकप्रिय ठरले. या सॉफ्टवेरच्या अभूतपूर्व यशामुळे वैयक्तिक संगणकांचा (पर्सनल कॉम्प्युटर) वापर व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढला आणि आयबीएम संगणकांच्या विक्रीला मोठी गती मिळाली.
पुढील काळात लोटसने व्यावसायिक संप्रेषणासाठी लोटस नोट्स आणि लोटस डॉमिनो ही प्रगत उपयोजने विकसित केली. ही अनुक्रमे ई-मेल आणि डेटाबेस व्यवस्थापनासाठी वापरली जात असे. १९९५ मध्ये तंत्रज्ञान कंपनी आयबीएमने लोटस सॉफ्टवेरला ३.५ अब्ज डॉलरला विकत घेतले. त्यानंतर ही कंपनी आयबीएम लोटस सॉफ्टवेर या नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे २०१२ मध्ये आयबीएमने लोटस ब्रँडचे नाव अधिकृतपणे टप्प्याटप्प्याने बंद केले आणि २०१३ मध्ये त्याच्या मुख्य उत्पादनांचे पुनर्रचना करून नव्या नावाने पुनर्गठन केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |