लोकमत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लोकमत (वृत्तपत्र) या पानावरून पुनर्निर्देशित)
लोकमत
LokmatLogo.jpg
प्रकार दैनिक वृत्तपत्र
आकारमान ७४९ बाय ५९७ मीमी

मालक जवाहरलाल दर्डा
प्रकाशक लोकमत मीडिया लिमिटेड
भाषा मराठी
मुख्यालय नागपूर
भगिनी वृत्तपत्रे लोकमत समाचार, लोकमत टाइम्स

संकेतस्थळ: http://lokmat.net/


लोकमत हे भारताच्या अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, नाशिक, पणजी, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, सोलापूर या बारा शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.

मुख्यालय - नागपूर, महाराष्ट्र

लोकमत हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या दैनिकाचे वर्चस्व आहे. लोकमत हे वाचकसंख्येनुसार मराठीतील क्रमांक एकचे वृत्तपत्र असून देशात याचा क्रमांक ४था आहे. (स्रोत: एन.आर.एस २००६) दर्डा कुटुंबीय या वृत्तपत्राचे मालक आहेत.

पुरवणी[संपादन]

लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत दररोज वेगवेगळ्या पुरवण्या देतात.

मंथन[संपादन]

मंथन ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत रविवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.

सखी[संपादन]

सखी ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत गुरुवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.

ऑक्सिजन[संपादन]

ऑक्सिजन ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत शुक्रवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.

संकेतस्थळ लोकमत.कॉम