लोकबिरादरी प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लोकबिरादरी प्रकल्प हा वरोरा जि.चंद्रपूर येथील महारोग सेवा समितीचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी २३ डिसेंबर १९७३ रोजी महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामधल्या हेमलकसा या गावातील माडिया गोंड या स्थानिक आदिवासी जमातीच्या विकासासाठी चालू केला. या प्रकल्पांतर्गत एक आश्रम शाळा, एक दवाखाना व प्राण्यांसाठीचे अनाथालय चालवले जाते. बाबा आमटे यांचे कनिष्ठ चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी २५ वर्षे सर्व अडचणींवर मात करत हा प्रकल्प आकाराला आणला. चालवत. आता सर्व जबाबदारी त्यांच्या मुलांनी व सुनांनी - डॉ दिगंत आमटे व डॉ अनघा आमटे आणि अनिकेत व समीक्षा यांनी स्वीकारली आहे. "About us". लोकबिरादरी प्रकल्प.

लोकबिरादरी प्रकल्पाचे प्रवेशद्वार


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]

लोकबिरादरी प्रकल्पाचे संकेतस्थळ