Jump to content

लॉरेन पॉवेल जॉब्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॉरेन पॉवेल जॉब्स
जन्म लॉरेन पॉवेल
=६ नोव्हेंबर, १९६३ (1963-11-06) (वय: ६१)
शिक्षण बी.ए., बीएससी, एम.बी.ए.
प्रशिक्षणसंस्था स्टॅनफर्ड विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया
पेशा व्यावसायिक
जोडीदार
स्टीव जॉब्स
(ल. १९९१; मृ. २०११)


लॉरेन पॉवेल जॉब्स (नोव्हेंबर ६, १९६३ - हयात)[] ह्या एक अमेरिकन अब्जाधीश व्यावसायिक महिला कार्यकारी आणि परोपकारी आहेत.[] जॉब्स याॲपल चे सह-संस्थापक स्टीव जॉब्सची विधवा असून स्टीव्ह जॉब्स ट्रस्टचे व्यवस्थापन देखील सांभाळतात.[] [] त्या इमर्सन कलेक्टिव्ह[] आणि एक्सक्यू इन्स्टिट्यूटच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत.[] डेमोक्रॅटिक पक्षाच्या राजकारण्यांना त्या मोठी देणगी देतात.[][][]

प्रारंभिक जीवन

[संपादन]

जॉब्सचे पालनपोषण न्यू जर्सीच्या वेस्ट मिलफोर्ड येथे झाले.[] त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया स्कूल ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसमधून राज्यशास्त्रात बीए आणि १९८५ मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून अर्थशास्त्रात बीएस पदवी मिळवली.[][१०][११] तिने १९९१ मध्ये स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए पदवी प्राप्त केली.[][११][१२]

सुरुवातीची कारकीर्द

[संपादन]

पॉवेल जॉब्स या टेराव्हेरा नावाच्या (नैसर्गिक खाद्यपदार्थ कंपनीच्या) सह-संस्थापक असून ही कंपनी संपूर्ण उत्तर कॅलिफोर्नियामध्ये किरकोळ विक्रेत्यांना विक्री करत असते.[][१३] जॉब्स यांनी चीवाच्या संचालक मंडळावर देखील काम केले, ज्याने विद्यार्थ्यांना प्रमाणित चाचणीची तयारी करण्यास मदत करण्यासाठी ऑनलाइन साधने तयार केली.[१३] बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, पॉवेल जॉब्स ह्या मेरिल लिंच ॲसेट मॅनेजमेंटमध्ये काम केले. याच सोबत त्यांनी गोल्डमन सॅक्समध्ये फिक्स्ड-इनकम ट्रेडिंग स्ट्रॅटेजिस्ट म्हणून देखील तीन वर्षे काम केले.[][१३]

स्टीव्ह जॉब्सचा मृत्यू

[संपादन]
जुलै २०२२ मध्ये जो बायडेन यांच्याकडून स्टीव्ह जॉब्सच्या वतीने स्वातंत्र्य पदक स्वीकारताना पॉवेल जॉब्स (डावीकडे)

५ ऑक्टोबर २०११ रोजी, वयाच्या ५६ व्या वर्षी, ॲपलचे सीईओ स्टीव जॉब्स यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले.[१४][१५] पॉवेल जॉब्स यांना स्टीव्हन पी. जॉब्स ट्रस्टचा वारसा मिळाला, ज्याचा मे २०१३ पर्यंत वॉल्ट डिस्ने कंपनीमध्ये सुमारे $12.1 बिलियन किमतीचा ७.३% हिस्सा आणि ॲपल चे ३८.५ दशलक्ष शेअर्स होते.[][][११]

२०१४ च्या फोर्ब्सच्या महिला अब्जाधीशांच्या यादीत त्या ५९ व्या क्रमांकावर होत्या.[१६][१७] तर फोर्ब्स ४०० मध्ये त्यांना ३०वे स्थान मिळाले.[१८] या यादीनुसार त्या तंत्रज्ञानातील यादीत एक गर्भश्रीमंत महिला ठरल्या.

१९९७ मध्ये, पॉवेल जॉब्स यांनी कार्लोस वॉटसन यांच्यासोबत कॉलेज ट्रॅकची सह-स्थापना केली.[१९] [२०]

धार्मिक आस्था

[संपादन]

जॉब्स या १३ जानेवारी २०२५ रोजी महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराज येथे पोहोचल्या. आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरि यांच्या कडून त्यांनी हिंदू धर्माची दिक्षा घेतली. यावेळी स्वामी कैलाशानंद गिरि यांनी जॉब्स चे कमला असे नामकरण केले.[२१]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Isaacson, Walter (2011). "Family Man". Steve Jobs (First ed.). Simon & Schuster. p. 269. ISBN 978-1-4516-4853-9. Lauren Powell had been born in New Jersey in 1963 and learned to be self-sufficient at an early age.
  2. ^ a b c d e f "Laurene Powell Jobs". Emerson Collective. August 11, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 17, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Laurene Powell Jobs & family". Forbes. Nov 2014. November 29, 2014 रोजी पाहिले.
  4. ^ a b Golum, Rob (Nov 24, 2011). "Jobs's 7.7% Disney Stake Transfers to Trust Led by Widow Laurene". Bloomberg News. July 4, 2013 रोजी पाहिले.
  5. ^ Harris, Elizabeth A. (2016-09-14). "$100 Million Awarded in Contest to Rethink U.S. High Schools". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. 2022-03-24 रोजी पाहिले.
  6. ^ Tindera, Michela. "Here Are The Billionaires Funding The Democratic Presidential Candidates, As Of September 2019". Forbes.
  7. ^ Schleifer, Theodore (July 16, 2020). "Silicon Valley pours money into Biden's campaign – and snubs Trump's". Vox.
  8. ^ Goldmacher, Shane (July 16, 2020). "Biden Banks $242 Million as Big-Name Donors Write Huge Checks". The New York Times.
  9. ^ a b Peter Lattman; Claire Cain Miller (May 17, 2013). "Steve Jobs's Widow Steps Onto Philanthropic Stage". The New York Times. May 18, 2013 रोजी पाहिले.
  10. ^ "Trustees' Council of Penn Women". University of Pennsylvania. Laurene Powell Jobs, CW'85
  11. ^ a b c "Laurene Powell Jobs". Forbes. September 17, 2013 रोजी पाहिले.
  12. ^ "President Obama Announces Members of the White House Council for Community Solutions". whitehouse.gov. December 14, 2010 – National Archives द्वारे.
  13. ^ a b c "Laurene Powell Jobs". Parsa. September 14, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 17, 2013 रोजी पाहिले.
  14. ^ "Rare Pancreatic Cancer Caused Steve Jobs' Death" (Press release). Voice of America. October 7, 2011. January 24, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 7, 2011 रोजी पाहिले.
  15. ^ "Apple Co-Founder Steve Jobs Dies At Age 56". Forbes. September 17, 2013 रोजी पाहिले.
  16. ^ "Laurene Powell Jobs & family". www.forbes.com. March 4, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 23, 2020 रोजी पाहिले.
  17. ^ "The World's Billionaires: Laurene Powell Jobs & family". Forbes. March 4, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 5, 2016 रोजी पाहिले.
  18. ^ "#30 Laurene Powell Jobs & family". Forbes. March 8, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 September 2020 रोजी पाहिले.
  19. ^ Schleifer, Theodore (29 September 2021). "Laurene Powell Jobs' Bizarre Week in the Headlines". Puck.news. 5 October 2021 रोजी पाहिले. Powell Jobs has been close with Ozy C.E.O. Carlos Watson for decades—the two co-founded College Track, her first philanthropic initiative, back in East Palo Alto in 1997
  20. ^ Bessie King (1 January 2008). "Get to know Carlos Watson". Blast. 5 October 2021 रोजी पाहिले. College Track, a program he co-founded to aid students in East Palo Alto
  21. ^ "अचानक महाकुंभ से लौटीं लॉरेन पॉवेल, 10 दिन तक करना था प्रवास; जाते हुए गुरु से ली ये दीक्षा". १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.