लेनोव्हो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेनोव्हो ही चीनमधील संगणक व इलेक्ट्रॉनिक वस्तु बनविणारी कंपनी आहे. याची स्थापना १९८४मध्ये झाली व २००४मध्ये हिला लेनोव्हो नाव देण्यात आले. लेनोव्होचे मुख्यालय चीनची राजधानी बीजिंगमध्ये आहे.

ही कंपनी लॅपटॉप, भ्रमणध्वनी, दूरचित्रवाणी संच सारख्या वस्तू बनविते.

२००५मध्ये आयबीएमने आपला संगणक व्यवसाय लेनोव्होला विकला.