लुचियानो पाव्हारोत्ती
Appearance
लुचियानो पाव्हारोटी (१२ ऑक्टोबर, १९३५:मोडेना, इटली - ६ सप्टेंबर, २००७:मोडेना, इटली) हा इटलीचा ऑपेरा गायक होता. टेनोर या सूरपट्टीत गाणारा पाव्हारोटी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑपेरा गायकांपैकी मानला जातो. वरच्या पट्टीत लीलया गाणाऱ्या पाव्हारोटीला किंग ऑफ द हाय सीझ (वरच्या सा चा राजा) असे टोपणनाव होते. याने गायलेले अव्हे मारिया हे करुणगीत प्रसिद्ध आहे.
पाव्हारोटीचा जन्म इटलीच्या मोडेना शहराजवळ झाला. याचे बालपण गरीबीत गेले.
