लिलिउओकलानी, हवाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिलिउओकलानी (जन्मनाव:लिडिया लिलिउ लोलोकु वलानिया कामाकाएहा; २ सप्टेंबर, १८३८:होनोलुलु, हवाईचे राजतंत्र - ११ नोव्हेंबर, १९१७:होनोलुलु, हवाई) ही हवाईची पहिली राणी व शेवटची राज्यकर्ती होती. ही २९ जानेवारी, १८९१ ते १७ जानेवारी, १८९३ दरम्यान सत्तेवर होती. अमेरिकेतून आलेल्या लोकांनी क्रांती करून तिला पदच्युत केले होते.

लिलिउओकलानीने अलोहा ओ सहित अनेक संगीतकृती रचल्या आणि हवाईझ स्टोरी बाय हवाईझ क्वीन हे आत्मचरित्रही लिहिले.