लिमाट नदी
| लिमाट | |
|---|---|
|
झ्युरिकमधील लिमाट, झ्युरिक सरोवर क्वेब्रुक पासून राथौसब्रुक, स्टेडथॉस्क्वे डावीकडे आणि लिममतक्वाई उजवीकडे दिसत आहे. | |
| Progression | साचा:RAare |




लिमाट स्वित्झर्लंडमधील एक नदी आहे. नदीची सुरुवात झ्युरिक सरोवरातून होते. हे सरोवर झ्युरिक शहराच्या दक्षिणेकडील भागात आहे. झ्युरिकपासून ती नदी उत्तर-पश्चिम दिशेला वाहते ही नदी ३५ किलोमीटर (२२ मैल) पुढे गेल्यानंतर आरे नदीला मिळते. हा संगम लहानशाब्रुग शहराच्या उत्तरेस आहे..
लिमाटच्या खोऱ्यात झ्युरिकच्या नंतर डायटिकॉन, वेटिंगन आणि बाडेन ही मुख्य शहरे येतात. लिमाट नदीच्या मुख्य उपनद्या लिंथ, वागीटलर आ आणि जोना या आहेत. या सर्व झ्यूरिक लेकशी निगडीत आहेत.
या नदीचा उल्लेख प्रथम ८ व्या शतकात सापडतो. त्यावेळेस याचे नाव लिंडिमाकस असे होते. या नावाचा संबंध गॉलियनशी आहे. यात लिंडो म्हणजे लेक (वेल्श इलिन) आणि मॅगोस म्हणजे सपाट (वेल्श मेस) असा आहे. आणि त्यामुळे बहुधा याचे मूळ नाव लिंथ असे होते.[१]
वीज निर्मिती
[संपादन]अनेक स्विस नद्यांप्रमाणेच लिमाट नदीचा वापर मोठ्या प्रमाणात जलविद्युत तयार करण्यासाठी वापर होतो.त्याच्या ३५ किमी (२२ मैल) मार्गाचा वापर केला जातो. त्याच्या घसरणीचा वापर कमीतकमी दहा जलविद्युत कंपन्यांद्वारे वीज निर्मीतीसाठी केला जातो. यामध्ये खालील केंद्रे समाविष्ट आहेत:
दळणवळण
[संपादन]ऐतिहासिकदृष्ट्या, लिमाट हा एक महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग होता. बाराव्या आणि तेराव्या शतकात, झ्युरिक ते कोब्लेनझ यादरम्यान प्रवासांची नोंद आहे. १४४७ मध्ये, सम्राट फ्रेडरिक तिसरा याने लिमाट आणि ऱ्हाइन नदींवर मुक्त प्रवास करण्याची मुभा झ्युरिकला दिली होती. प्रवाहामुळे प्रवास सामान्यतः फक्त डाउनस्ट्रीम (खालच्या दिशेला) होतो. आगमन झाल्यावर बार्गेस विकल्या जात होत्या.[७]
आज, लिमाट केवळ लहान नौकांद्वारे त्याच्या लांबीच्या बऱ्याच भागासाठी नौकाविहारयोग्य आहे. यामध्ये अनेक जलविद्युत प्रकल्प समाविष्ट आहेत. या नदीवर बऱ्याच ठिकाणी बोट लिफ्ट पद्धत वापरली जाते. नदीवर वापरली जाणारी पारंपारिक बोट प्रकार वेडलिंग हा आहे. याचा तळ सपाट असतो आणि ही बोट १० मीटर (३३ फूट) लांब असते.[८][९]
झ्युरिकच्या मध्यभागी नदीचा वरचा भाग मोठ्या जहाजांद्वारे नौकाविहारयोग्य आहे. नदीच्या या भागात झेडएसजी (लेक झुरिच नेव्हिगेशन कंपनी) लिमाट बोट सेवा चालवते. हा मार्ग लँड्स म्युझियम ते झ्युरिक सरोवर असा आहे..[१०]
नदीजवळील शहरे
[संपादन]- झ्युरिक कॅन्टन मध्ये
- झ्युरिक
- ओबेरेंगस्ट्रिंगन
- अंडरंगस्ट्रिंगन
- श्लिरेन
- डायटिकॉन
- गेरोल्ड्सविल
- ओटविल अँड डेर लिमाट
- आर्गाऊ कॅन्टन मध्ये
- स्प्रेटेनबाख
- व्युरेनलोस
- न्युएनहोफ
- वेटिंगन
- बाडेन
- एनेटबाडेन
- नुसबाउमेन एजी
- अंडरसिग्न्थाल
- तुर्गी
सांस्कृतिक वारसा
[संपादन]लिमाट आणि झुरिच सरोवर यांच्या मध्ये सेचसेलाउटेनप्लाट्झ हा एक भाग आहे. येथे प्रागैतिहासिक स्टील्ट घरे आहेत. ही घरे कधीकधी येणाऱ्या पूरापासून संरक्षण करण्यासाठी लिंथ आणि जोना यादरम्यान बांधली होती. झ्यूरिक-एंगे अल्पेनक्वाय झ्यूरिक तलावाच्या किनारपट्टीवर आहे. एंगे ही एक झ्युरिकची स्थानिक नगरपालिका आहे. या वसाहतींनी शेजारी क्लेनर हाफनर आणि ग्रॉसर हाफनर आहेत. लिमाट सुमारे ०.२ चौरस किमी (४९.४२ एकर) झुरिच शहरात मोडतो. तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या ५६ स्विस स्थळांचा भाग आहे. आल्प्सच्या आसपास प्रागैतिहासिक ढीग घरे, ही वसाहत देखील यादीत आहे राष्ट्रीय आणि प्रादेशिक महत्त्व असलेल्या सांस्कृतिक संपत्तीची स्विस यादी एक म्हणून ऑब्जेक्ट वर्ग आहे.[११][१२][१३]
संदर्भ
[संपादन]- ^ Die vorrömische Schweiz im Lichte geschichtlicher Zeugnisse und sprachlicher Tatsachen
- ^ a b c d "Limmat Power Generation". Regional Werke AG Baden. 2013-05-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-25 रोजी पाहिले.
- ^ "Flusskraftwerk Dietikon". Elektrizitätswerke des Kantons Zürich. 2013-05-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-25 रोजी पाहिले.
- ^ "Kraftwerk Höngg". City of Zürich. 2013-06-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-25 रोजी पाहिले.
- ^ "Kraftwerk Letten". City of Zürich. 2013-06-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-25 रोजी पाहिले.
- ^ "Kraftwerk Wettingen". City of Zürich. 2013-01-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-25 रोजी पाहिले.
- ^ "Limmat". Historical Dictionary of Switzerland (जर्मन भाषेत). 2013-04-24 रोजी पाहिले.
- ^ "Funicular Boat Lifts of Switzerland". funimag.com. 2013-04-24 रोजी पाहिले.
- ^ "Clubportrait Schiffe" (जर्मन भाषेत). 2005-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-24 रोजी पाहिले.
- ^ "Limmat river cruises". Zürichsee-Schifffahrtsgesellschaft. 2022-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-24 रोजी पाहिले.
- ^ "A-Objekte KGS-Inventar". Schweizerische Eidgenossenschaft, Amt für Bevölkerungsschutz. 2009. 2010-06-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-10 रोजी पाहिले.
- ^ "Prehistoric Pile Dwellings in Switzerland". Swiss Coordination Group UNESCO Palafittes (palafittes.org). 2014-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-10 रोजी पाहिले.
- ^ "World Heritage". palafittes.org. 2014-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-10 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमिडिया कॉमन्सवर Limmat शी संबंधित संचिका आहेत.- Limmat in German, French and Italian in the online Historical Dictionary of Switzerland.