लिझीमोल फिलीपोस पामाडीकंडथिल
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| व्यवसाय | शास्त्रज्ञ |
| नियोक्ता | श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी |
| पुरस्कार | नारी शक्ती पुरस्कार |
लिझिमोल फिलिपोस पामाडीकंडथिल ह्या एक भारतीय दंत साहित्य शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना २०१७ साली नारी शक्ती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा भारतातील महिलांसाठी असलेला सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
जीवन
[संपादन]त्यांनी कोट्टायम येथील महात्मा गांधी विद्यापीठातून डॉक्टरेट आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे. १९९८ मध्ये त्यांना मानद पदवी देण्यात आली.[१]
केरळ सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण राज्य समितीचा २००२ सालचा युवा वैज्ञानिक पुरस्कार देखील तिला मिळाला आहे.[१]
२०१५ मध्ये त्यांना युथ ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञानातील त्यांच्या कामगिरीबद्दल युथ असोसिएशन, चर्च ऑफ द ईस्ट, सेंट्रल कमिटी, इंडिया कडून कौतुकाचे प्रमाणपत्र दिल्या गेले. तसेच केएससीएसटीई, केरळ सरकारचा डॉ. एस. वासुदेव पुरस्कार २०१४[२] देखील त्यांना मिळाला आहे.

८ मार्च २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी, नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार[३] प्राप्त करणाऱ्या तीस महिला आणि नऊ संस्थांपैकी त्या एक होत्या.[४] केरळमधील इतर पुरस्कार विजेते मंदिर चित्रकार श्यामला कुमारी आणि प्राणीशास्त्रज्ञ एम.एस. सुनील होते.[५] पुरस्काराचे स्वरूप १,००,००० रुपये होते. दंत पुनर्संचयनासाठी आणि इम्प्लांट निश्चित करण्यासाठी हाडांच्या सिमेंट म्हणून वापरता येणारे बायोएक्टिव्ह पॉलिमर आणि पॉलिमर आधारित संमिश्र साहित्य विकसित केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.[५]
लिझीमोल ह्या त्रिवेंद्रम येथील श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात.[१]
भारत सरकारने दिलेल्या तंत्रज्ञान नवोन्मेषासाठीच्या ७व्या आणि १०व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.[६] त्यांना २०२० मध्ये केरळ सरकारच्या केएससीएसटीई कडून केरळ राज्य विज्ञान साहित्य पुरस्कार (बाल विज्ञान) मिळाला आहे. याच सोबत त्यांच्याकडे ३० पेटंट आहेत. ज्यापैकी २१ मंजूर भारतीय पेटंट आहेत. याशिवाय ११ हस्तांतरित तंत्रज्ञान आणि अनेक व्यावसायिक तंत्रज्ञानाचा देखील समावेश आहे.
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 "People - Sree Chitra Tirunal Institute for Medical Sciences and Technology, Trivandrum". www.sctimst.ac.in (इंग्रजी भाषेत). 2020-05-06 रोजी पाहिले.
- ↑ "List of Dr. S. Vasudev Awardees – Kerala State Council for Science, Technology & Environment" (इंग्रजी भाषेत). 2021-01-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "On International Women's Day, the President conferred the prestigious Nari Shakti Puraskars to 30 eminent women and 9 distinguished Institutions for the year 2017". pib.gov.in. 2020-05-06 रोजी पाहिले.
- ↑ "Infographic: Nari Shakti Puraskar". The Times of India (इंग्रजी भाषेत). 7 March 2018. 2020-05-06 रोजी पाहिले.
- 1 2 "Scientist, social worker and mural artist: Meet Nari Shakti winners from Kerala". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2018-03-08. 2021-01-19 रोजी पाहिले.
- ↑ "DV Sadananda Gowda presents 10th National Awards for Technology Innovation in Petrochemicals & Downstream Plastics Processing Industry for FY19-20". affairscloud.com. 2021-04-06 रोजी पाहिले.