लिंकन विमानतळ
| लिंकन विमानतळ Lincoln Airport | |||
|---|---|---|---|
| आहसंवि: LNK – आप्रविको: KLNK | |||
| माहिती | |||
| स्थळ | लिंकन (नेब्रास्का), अमेरिका | ||
| समुद्रसपाटीपासून उंची | १,२१९ फू / ३७२ मी | ||
| संकेतस्थळ | |||
लिंकन विमानतळ (आहसंवि: LNK, आप्रविको: KLNK) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील लिंकन शहरातील सार्वजनिक व लष्करी विमानतळ आहे. हा विमानतळ लिंकन विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीचे असून लिंकन शहराच्या वायव्येस सुमारे ८ किमी अंतरावर आहे. हा विमानतळ ओमाहानंतर नेब्रास्कामधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. हा समुद्रसपाटीपासून ३७२ मीटर (१,२१९ फूट) उंचीवर आहे.
डंकन एव्हियेशन या विमान देखभाल कंपनीचे मुख्यालय येथे आहे.
लिंकन विमानतळाची रचना १९२० च्या दशकात झाली. चार्ल्स लिंडबर्ग यांनी १९२२ मध्ये येथे उड्डाण प्रशिक्षण घेतले होते. १९२८ मध्ये येथे हवाई टपाल सेवा केंद्र उभारले गेले. त्याच वेळी युनायटेड एरलाइन्सने येथे प्रवासी सेवा सुरू केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात याचे नाव लिंकन आर्मी एर फील्ड होते.
टर्म्स ऑफ एंडियरमेंट (१८३), येस मॅन आणि प्लेन्स (२०१३) या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले होते.
सुविधा व वापर
[संपादन]हा विमानतळ मुख्यतः खाजगी विमानवाहतुकीसाठी वापरला जातो. येथून काही नियमित व्यावसायिक उड्डाणे देखील उपलब्ध आहेत. २०२४ मध्ये येथे सुमारे २,५१,००० प्रवाशांनी ये-जा केली.
लष्करी उपयोग
[संपादन]लिंकन विमानतळावर नेब्रास्का एर नॅशनल गार्डचा विमानात इंधनभरती करणारी १५५वी एर रिफ्युएलिंग विंग तैनात आहे. हे केसी-१३५आर स्ट्रॅटोटँकर प्रकारची विमाने वापरते. हा विमानतळ पूर्वी नेव्हल एर स्टेशन लिंकन म्हणूनही वापरला जात असे.
धावपट्ट्या
[संपादन]| दिशा | लांबी (मी) | लांबी (फूट) | प्रकार |
|---|---|---|---|
| 18/36 | 12,901 | 3,932 | डांबर/काँक्रीट |
| 14/32 | 8,649 | 2,636 | डांबर/काँक्रीट |
| 17/35 | 5,800 | 1,768 | डांबर/काँक्रीट |
विमान कंपन्या व गंतव्यस्थाने
[संपादन]लिंकन विमानतळावर सध्या खालील विमान कंपन्यांची सेवा उपलब्ध आहे:
| विमान कंपनी | गंतव्यस्थाने |
|---|---|
| युनायटेड एरलाइन्स | शिकागो, डेन्व्हर |
| ब्रीझ एरवेझ | लॉस एंजेलस (नोव्हेंबर २०२५ पासून), ऑरलँडो (डिसेंबर २०२५ पासून) |
| डेल्टा कनेक्शन | डेट्रॉइट |
सांख्यिकी
[संपादन]| घटक | माहिती |
|---|---|
| एकूण प्रवासी (२०२४) | २,५१,००० |
| विमान उड्डाणावतरणे (२०२४) | ७४,४२४ |
| येथे तैनात विमाने (२०२३) | १७४ |
| धावपट्ट्या | ३ |
| सर्वात लांब धावपट्टी | १२,९०१ फूट (३,९३२ मीटर) |