लाल डोक्याचा ससाणा
Appearance
लाल डोक्याचा ससाणा, आकोस, आडेरा, मोरगी किंवा तुरमती (इंग्लिश: Red-headed falcon, Red-headed merlin; हिंदी: तुरुमती, तुरुमतरी, तुरुमतु; गुजराती: तुरमती, चटवा; तेलुगू:जेल्ल गट, जेल्ल गद्द, तिरूमुंडि डेग) हा एक शिकारी पक्षी आहे.
ओळख
[संपादन]हा आकाराने अंदाजे कबुतराएवढा सुबक सुंदर ससाणा असतो. वर निळसर करडा, खाली पांढरा असतो. पोट व पंखांवर काळवट, दाट पट्टे व काड्या असतात. त्यांच्या पंखांची पांढरी किनार आणि वरचे रुंद काळे पट्टे उडताना ठळक दिसतात. डोके काळसर तांबूस असते. नर-मादी दिसायला सारखे असतात. मादी नरापेक्षा मोठी असते. नेहमी जोडीने राहतात.
वितरण
[संपादन]निवासी व अंशतः स्थलांतर करणारे. पूर्वेकडे आसाम आणि बांगला देश, तसेच भारतीय द्वीपकल्पात आढळतात. जानेवारी ते मार्च हा त्यांच्या वीणीचा काळ आहे.
निवासस्थाने
[संपादन]हे पक्षी माळराने, राया आणि भातशेती, तसेच विरळ जंगले येथे असतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली