लाटेक्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


लाटेक्
LaTeX logo.svg
मूळ लेखक लेज्ली लॅम्पर्ट
प्रारंभिक आवृत्ती १९८५
परवाना लाटेक प्रोजेक्ट पब्लिक लायसन्स़
संकेतस्थळ https://www.latex-project.org//

लाटेक् (LaTex) ही उच्च दर्जाची अक्षरजुळणी करण्यासाठी वापरण्यात येणारी आणि मुक्त आज्ञावलीच्या स्वरूपात उपलब्ध असलेली आज्ञावली आहे.[१] ही आज्ञावली दि लाटेक् प्रोजेक्ट पब्लिक लायसन्स ह्या मुक्त परवान्या-अंतर्गत वितरित करण्यात आली आहे. ह्या आज्ञावलीची पहिली आवृत्ती लेज्ली लॅम्पर्ट ह्यांनी १९८५ साली प्रकाशित केली असून ती डोनाल्ड नूथ (क्नूथ) ह्यांच्या टेक् (TeX) ह्या आज्ञावलीवर आधारित होती.

ह्या आज्ञावलीत साध्या पाठ्य (टेक्स्ट) स्वरूपात मजकूर लिहिला जातो आणि अक्षरजुळणीच्या वैशिष्ट्यांसाठी मांडणीच्या खुणा (मार्क-अप टॅग) मजकुरात आवश्यक तिथे देण्यात येतात. ह्या साध्या पाठ्य (टेक्स्ट) धारिकेला .tex असा प्रत्यय जोडून ही धारिका संगणकावर साठवण्यात येते आणि मग लाटेक् ह्या आज्ञावलीद्वारे (लाटेक् इंजिनद्वारे) तिच्यावर प्रक्रिया होऊन मजकूर मांडलेल्या धारिकेच्या स्वरूपात (पीडीएफ धारिका) फलित मिळते.

लाटेक्-मध्ये देवनागरी मजकूर[संपादन]

लाटेक्-मध्ये देवनागरी लिपीचा वापर करता येतो. त्यासाठी फॉण्टस्पेक, पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच (पॅकेज) वापरावे लागतात. तसेच प्रक्रिया करण्यासाठी क्सेलाटेक् (XeLaTeX) ही आज्ञावली (लाटेक्-इंजिन) वापरावे लागते. देवनागरी लिपीचे आधुनिक टंक वापरून लाटेक्-मध्ये देवनागरी अक्षरजुळणीही करता येते.

लाटेक् वापरून ग्रंथांच्या विविध आणि रंगीत रचना करणे शक्य आहे. ही आज्ञावली वापरून महाराष्ट्रातील एका लाटेक् गटाने काही पारंपारिक ग्रंथांच्या पुनर्मांडण्या केल्या आहेत.[२]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]


संदर्भसूची[संपादन]