लांब केस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लांब केस

भारतीय स्त्री ही निसर्गत:च सुंदर असल्याचे जगभरातल्या लोकांचे मत आहे. तिच्या या सौंदर्यात तिचे लांब, चमकदार आणि निरोगी केस हे मोलाची भर टाकतात. लांब केस हे आरोग्याचे प्रतिबिंब आहे. शरीरात झालेल्या बिघाडाचा परिणाम सर्वप्रथम केसांवर दिसतो. म्हणूनच सौंदर्यात भर टाकण्याबरोबरच केस आपल्या आरोग्याचेही निदर्शक मानले जातात. केस लांब असो वा मध्यम, ते निरोगी आणि दाट असले तरच चर्चेचा विषय बनतात.

पुराणकथांमध्येही स्त्रीच्या लांब आणि निरोगी केसांचा उल्लेख वारंवार आलेला आहे. 'रामायण'त सीतेच्या तर 'महाभारत'त दौपदीच्या केशसंभाराची रसाळ वर्णने अनेकदा वाचायला मिळतात. लांब आणि निरोगी केसांचा वारसा आजच्या आधुनिक विचारांच्या भारतीय स्त्रीनेही मोठ्या आपुलकीने जपला आहे.

प्रत्येक स्त्रीला आपले केस लांब आणि घनदाट असावेत असे वाटते. त्यासाठी काही वेळेस काही घरगुती उपायांनी तर अनेकदा बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरून केस जास्तीत जास्त चांगले कसे राहतील यासाठी प्रयत्न केला जातो. केसांचे आरोग्य चांगले राहण्यामध्ये वातावरण, हवामान, केस धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, आहार, केसाला लावली जाणारी शॅम्पू, कंडिशनर, तेल इत्यादी गोष्टीचा हिस्सा असतो.

घरगुती उपाय[संपादन]

  • केस हलकेपणे कोरडे करणे

केस धुतल्यानंतर ते अतिशय हलक्या हाताने कोरडे करणे गरजेचे असते. जोर लावून केस पुसल्यास ते तुटण्याची शक्यता जास्त असते. पाणी शोषून घेईल असा अतिशय पातळ टॉवेल केस पुसण्यासाठी वापराल्यास केस तुटत नाहीत. अनेकींना केस जोरजोरात झटकण्याचीही सवय असते. हीहि सवय चुकीची आहे. त्यामुळे केस तुटू शकतात. तसेच ओले केस न विंचरता हातांनी हे केस तुम्ही सारखे केल्यास तुटण्याची शक्यता नसते.

  • केसांची नियमित मसाज करणे

केस असो या शरीराचा अन्य अवयव, मसाज हा चांगलाच असतो. केसांच्या मुळांशी योग्य पद्धतीने केलेला मसाज फायदेशीर असतो. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. खोबरेल तेल किंवा बदाम तेलाने मुळांना मसाज केल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामध्ये स्वतःच्या हाताने, कुटुंबातील व्यक्तीकडून, मैत्रिणींकडून किंवा पार्लरमध्ये मसाज करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

  • रोज केस धुणे टाळणे

केसांमध्ये नैसर्गिकरीत्या तेल तयार होत असते आणि हे तेल केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. अनेकांना विशेषतः मुलींना केस चांगले दिसावेत यासाठी रोज केस धुण्याची सवय असते. परंतु ही सवय धोकादायक आहे .अशामुळे केसात निर्माण होणारे नैसर्गिक तेल नष्ट होते आणि केसांची गुणवत्ता खराब होते नैसर्गिक केस हेच उत्तम केस असतात.

  • तेल आठवड्यातून दोनदा लावणे

शरीराच्या अवयवांप्रमाणेच केसांनाही योग्य पद्धतीने पोषण होणे अतिशय गरजेचे असते. केसांच्या मुळांना तेल लावल्याने केसांच्या वाढीसाठी आवश्यक ती पोषकद्रव्ये मिळतात. त्यामुळे केस लांब आणि मजबूत राहतात. केसांना कोमट तेल लावल्यानंतर केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करतात. तेल लावल्यानंतर टॉवेल गरम पाण्यात टाकून तो पिळून केसांना बांधतात. असे १० मिनिटांसाठी केल्यास केसांमध्ये तेल योग्य पद्धतीने मुरण्यास मदत होते. दोन तासांनी केस शाम्पूने धुवून टाकणे. ह्या पद्धतीने तेल लावल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होण्यासही मदत होते.

  • प्रत्येकवेळी कंडिशनर वापरणे

केस चांगले ठेवायचे असतील तर कंडिशनर वापरणे अतिशय आवश्यक असते. शाम्पू रोज वापरायचा नाही, परंतु कंडिशनरमुळे केसांत आर्द्रता राहण्यास मदत होते; प्रदूषण आणि धूळ यांपासून केसांचे रक्षण होते. स्वतःच्या केसांची गुणवत्ता लक्षात घेऊन योग्य तो शाम्पू आणि कंडिशनर यांची निवड करणे हेही महत्त्वाचे आहे.

संदर्भ[संपादन]

http://khaasre.com/tips-for-hair/

https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/fashion/-/articleshow/5453916.cms

http://www.thehealthsite.com/marathi/photo-gallery/beauty-simple-tricks-for-hair-to-appear-long-g0517/

https://www.marathigold.com/anti-hair-fall-pack/