काळू बाळू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लहू खाडे या पानावरून पुनर्निर्देशित)

तमाशासम्राट लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू, (१६ मे, इ.स. १९३३[१][२] - ७ जुलै, इ.स. २०११; कवलापूर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र) हे मराठी तमाशा कलावंत, अभिनेते व तमाशा फडाचे मालक होते. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश संभाजी खाडे म्हणजेच बाळू यांच्यासह जहरी प्याला या वगनाट्यात काळू-बाळू नावाच्या पोलीस हवालदारांच्या जोडगोळी रंगवली होती. त्यांच्या या भूमिका महाराष्ट्रभर इतक्या गाजल्या, की ते जोडनाव या दोघा भावंडांचे टोपणनाव बनले.

जीवन[संपादन]

खाड्यांचा जन्म १६ मे, इ.स. १९३३ रोजी झाला. त्यांच्या घरी तीन पिढ्यांपासून तमाशाचा पेशा चालू होता[२]. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश खाडे यांच्यासह ती परंपरा पुढे चालू ठेवली. जहरी प्याला या वगनाट्यामुळे काळू-बाळू या जोडीचे नाव महाराष्ट्रभर झाले. त्यांचा राम नाही राज्यात हा वगही गाजला.

काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी इ.स. १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार संयुक्तपणे देऊन गौरवण्यात आले [३].

वगनाट्ये[संपादन]

  • जिवंत हाडाचा सैतान
  • रक्तात रंगली दिवाळी
  • कोर्टात मला नेऊ नका
  • काळसर्पाचा विषारी विळखा
  • कथा ही दोन प्रेमिकांची
  • इंदिरा काय भानगड ?
  • रक्तात न्हाली अब्रू
  • इश्क पाखरू
  • लग्नात विघ्न
  • सत्ता द्यावी सुनेच्या हाती

आत्मकथन[संपादन]

  • काळू-बाळू या नावाने यांचे आत्मकथन २००८ साली प्रसिद्ध झाले आहे. शब्दांकन सांगली येथील सुधीर कुलकर्णी यांनी केले असून प्रकाशक शुभदा कुलकर्णी या आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "तमाशा कलावंत काळू यांचे निधन". ९ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]
  2. ^ a b "तमाशासम्राट लहू खाडे यांचे निधन". ९ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "संगीत नाटक अकादमी पुरस्कार - पुरस्कारविजेत्यांची सूची" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-07-27. ९ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)