लहान कोरल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लहान कोरल
चिल्का सरोवरातील लहान कोरल

लहान कोरल (इंग्लिश:Eurasian Whimbrel; हिंदी:छोटा गोंघ, छोटा गुलिंदा) हा एक पक्षी आहे.

ओळख[संपादन]

हा पक्षी हुबेहूब कोरलसारखाच; परंतु आकाराने लहान असतो. त्याच्या काळ्या डोक्यावर मधोमध पांढुरकी पट्टी, पांढुरक्या भुवया, चोच लहान असते. डोक्यावर रुंद काळे पांढरे पट्टे असतात. पिसांचा वर्ण गर्द आणि तपकिरी असतो. शेपटीवर असलेला पांढुरका त्रिकोण अस्पष्ट, पंखांखाली रंग पांढरा शुभ्र आणि त्यावर धुरकट रंगाचे पट्टे असतात.

वितरण[संपादन]

हे पक्षी भारतीय उपखंड, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांच्या समुद्रकिनाऱ्यावर हिवाळी पाहुणे असतात.

निवास[संपादन]

ते दलदली, सागरकिनारे, चिखलाणी अश्या भागात वास्तव्य करतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली