ललितांबिका अंतर्जनम्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.
सात कवितासंग्रह, मुलांसाठी लिहिलेली चार पुस्तकं, एक वैचारिक लेखसंग्रह, एक आत्मकथन, एक कादंबरी असं ललितांबिकांचं विपुल लेखन आहे. त्यांच्या ‘अग्निसाक्षी’ या कादंबरीला साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत; पण त्यांची खरी ताकद आहे, ती त्यांच्या कथांमध्ये, पंधरा कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या कथांनी मल्याळी कथेला शक्ती दिली, ओज दिलं; सामाजिक परिवर्तनाचं एक हत्यारही दिलं.[२]

व्यतिगत जीवन[संपादन]

वयाच्या तेराव्या वर्षीच ललितांबिकांनी पहिला लेख लिहिला आणि तो छापूनही आला. नंतर टागोरांच्या ‘घरे-बाईरे’ कादंबरीनं प्रभावित होऊन तशीच एक कादंबरी लिहिली आणि पुढे तिचं स्वत:च मूल्यमापन करून ती फाडूनही टाकली. एक नाटक लिहिलं, प्रेम करणारी, स्वत:वरची अन्याय्य बंधनं झुगारणारी स्त्री केरळच्या रंगभूमीत दिसू लागली होती. एका तरुण विधवेच्या पुनर्विवाहावर आधारलेलं एक धाडसी नाटक लिहून ललितांबिकाही रंगभूमीवरच्या त्या बंडखोरीत सामील झाल्या.[३]

सगळ्या बायकांची एकच जात असते – ‘बाई जात’ – असं म्हणणाऱ्या ललितांबिका काळाच्या काळजातला स्त्रीमुक्तीचा स्वर मुखर करणाऱ्या लेखिका होत्या. ‘सीता ते सत्यवती’ नावाच्या या लेखसंग्रहातून त्यांनी त्या दोन्ही महाकाव्यांमधल्या स्त्रियांना महाकाव्याच्या पानांमधून बाहेर काढलं आणि त्यांच्या प्रतिमांमधून उष्ण रक्त खेळवलं. मिथकांचं पुनर्वाचन करण्याचा त्यांचा तो यशस्वी प्रयत्न होता. भारतीय स्त्रीच्या मुक्तीचा इतिहास ज्या साहित्याच्या आधारे लिहिला जाईल, त्यात ललितांबिकांच्या कथांची नोंद अग्रक्रमानं असेल यात शंका नाही.

सुदैवानं त्यांना फार चांगला जीवनसाथी मिळाला. त्याच्याबरोबर त्या सूत कातू लागल्या, कापड विणू लागल्या आणि न घाबरता स्वातंत्र्य चळवळीचा पुरस्कारही करू लागल्या. १९०९ ते १९८५ पर्यंतचा म्हणजे मृत्यूपर्यंतचा वयाचा अमृतमहोत्सवी कालखंड ललितांबिकांनी कसदार लेखनानं गाजवला.

आत्मकथन[संपादन]

आत्मकथाक्कोरु आमुखम्, ‘कास्ट मी आऊट इफ यू विल’ – ललितांबिकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निवडक कथा आणि आत्मकथन समाविष्ट असणारा संग्रह ‘स्त्री’ या प्रकाशन संस्थेने १९९८ मध्ये इंग्रजीतून प्रसिद्ध केला.[४]

कादंबरी[संपादन]

अग्निसाक्षी

कवितासंग्रह[संपादन]

भावरीप्ती, नि:शब्द संगीतम्

कथासंग्रह[संपादन]

मुडुपदाथिल, कलाथिंडे इडुकल, कानििरटे पंजरी, इस पथु वर्षथिन्डु सेशम, अग्निपुष्पंगल

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
  2. ^ तिवारी, सियाराम (2015). Bhartiya Sahitya Ki Pahchan (hi मजकूर). Vani Prakashan. आय.एस.बी.एन. 9789350729922. 
  3. ^ "प्रतिकारदेवतेचं अवतरण घडवणारी कथा". Loksatta (mr-IN मजकूर). 2018-09-29. 2018-10-24 रोजी पाहिले. 
  4. ^ "ललितांबिका अंतर्जनम् - यूनियनपीडिया, अर्थ वेब विश्वकोश". hi.unionpedia.org (hi मजकूर). 2018-10-24 रोजी पाहिले.