Jump to content

लतिका ठुकराल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
লাতিকা থুক্রাল (bn); Latika Thukral (fr); લતિકા ઠુકરાલ (gu); Latika Thukral (ast); Latika Thukral (en); Latika Thukral (nl); Latika Thukral (sq); लतिका ठुकराल (mr); లతికా తుక్రాల్ (te); ਲਤਿਕਾ ਠੁਕਰਾਲ (pa); লতিকা ঠুকৰাল (as); Լատիկա Թուկրալ (hy); Latika Thukral (de); இலத்திகா துக்ரால் (ta) Transformed her town in India (en); Transformed her town in India (en); Indiaas bankierster (nl); banquera india (ast)
लतिका ठुकराल 
Transformed her town in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखc. इ.स. १९६७
भारत
नागरिकत्व
निवासस्थान
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • बँकर
नियोक्ता
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

लतिका ठुकराल (जन्म :१९६७ ) ही एक भारतीय बँकर आहे जिने तिच्या शहराचा, विशेषतः गुरगावमधील अरावली जैवविविधता उद्यानाचा कायापालट केला. इथे तिने 'आयएमगुरगाव' या गटाच्या सहकार्याने दहा लाख स्थानिक झाडे लावली. या कामासाठी तिला२०१५ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले.

जीवन

[संपादन]

ठुकरालचा जन्म सुमारे १९६७ मध्ये झाला.[] तिने दिल्ली विद्यापीठातून मार्केटिंगमध्ये पदवी प्राप्त केली. तिने प्रथम आयटीसी हॉटेल्समध्ये दोन वर्षे काम केले. नंतर सिटी बँकेत १८ वर्ष काम केले, जिथे ती वरिष्ठ उपाध्यक्ष बनली.

लतिका ठुकराल राष्ट्रपतींकडून नारी शक्ती पुरस्कार स्विकारताना

ती १९९६ मध्ये गुडगाव शहरात राहायला आली होती. हे शहर कोणत्याही नगररचना नियोजनाशिवाय अस्ताव्यस्त वाढलले होते.[] ती एका मध्यमवर्गीय लोकांच्या परिसरात राहत होती. इथे एका उद्यानाकडे तिचे लक्ष वेधले गेले. तिने १९९९ मध्ये 'आयएमगुरगांव' ही मोहीम सुरू केली.[] आणि इतर स्वयंसेवकांच्या सहकार्याने एक उपक्रम राबवला. यात त्यांनी त्यांच्या शहरात दहा लाख स्थानिक झाडे लावण्याचा निर्णय घेतला.[]

२०१० मध्ये प्रजासत्ताक दिनी हरियाणा सरकारने तिचा पुरस्कार देऊन सन्मान केला. 'आयएमगुरगाव' स्थानिक सरकारसोबत काम करत आहे आणि त्यांच्या प्रकल्पांना कॉर्पोरेट कंपन्यांकडून पाठिंबा मिळाला आहे.[]

२०१५ मध्ये तिच्या नेतृत्व आणि कामगिरीसाठी तिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[] हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय महिला दिनी तत्कालीन भारतीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात आला होता.[]

२०२० मध्ये कोरोना विषाणूच्या उद्रेकादरम्यान, 'आयएमगुरगाव' हा गट शहरातील गरीब कुटुंबांना शिजवलेले अन्न पुरवण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात सहभागी होता. एप्रिलमध्ये ठुकराल यांनी असा अंदाज आला होता की त्यांना किमान दोन महिने तरी सामान्य नागरिकांना अन्न पुरवठा करावा लागेल. यासाठी प्रत्येक कुटुंबासाठी दरमहा ३,२५० रुपये खर्च करावा लागणार होता आणि अंदाजे पंधरा ते वीस हजार कुटुंबे होती.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "She's every woman..." India Today (इंग्रजी भाषेत). 7 March 2013. 2020-04-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Latika Thukral". BD Foundation | Beyond Diversity (इंग्रजी भाषेत). 2020-10-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-18 रोजी पाहिले.
  3. ^ "Turning the city green, a million trees at a time". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-03-09. 2020-04-18 रोजी पाहिले.
  4. ^ "Latika Thukral". Adventure Nation (इंग्रजी भाषेत). 2019-07-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-18 रोजी पाहिले.
  5. ^ "Stree Shakti Puraskar and Nari Shakti Puraskar presented to 6 and 8 Indian women respectively". India Today (इंग्रजी भाषेत). 9 March 2015. 2020-04-22 रोजी पाहिले.
  6. ^ "Nari Shakti Puraskar awardees full list". Best Current Affairs. 9 March 2017. 2020-04-18 रोजी पाहिले.
  7. ^ "Gurugram civic body identifies 250 clusters for supply of essentials". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-04-05. 2020-04-18 रोजी पाहिले.