लघुसद्धांतकौमुदी मधील स्वरसंधींचा अल्प परिचय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अच् संधि

दोन भिन्न शब्द एकत्र जोडण्याला संधि करणे असे म्हणतात. ( संधि म्हणजे जवळ जवळ आलेले दोन ध्वनी एकत्र करणे. ) दोन शब्दांची संधि करताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकमेकांत मिसळून त्या दोहोंव्यतिरिक्त एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास संधि असे म्हणतात. असा या संधि मुळात ३ प्रकारच्या असतात. १. स्वर संधि - जेव्हा जोडल्या जाणारे दोन्ही वर्ण स्वर असतात, तेव्हा होणाऱ्या संधिस स्वर संधि असे म्हणतात. २. व्यंजन संधि - जेव्हा जोडल्या जाणारे दोन्ही वर्ण व्यंजने असतात किंवा किमान पहिला वर्ण व्यंजन असतो तेव्हा होणाऱ्या संधिस व्यंजन संधी असे म्हणतात. ३. विसर्ग संधि - जेव्हा जोडल्या जाणाऱ्या दोन शब्दांतील पहिल्या शब्दाच्या अंती विसर्ग असतो, तेव्हा होणाऱ्या संधिला विसर्ग संधि असे म्हणतात. तेथे निसर्गाचा विकार होतो.

स्वर संधि / अच् संधि -

जेव्हा जोडल्या जाणारे दोन्हीही वर्ण स्वर असतात, तेव्हा होणाऱ्या संधीला स्वर संधि असे म्हणतात. अशा स्वर संधि एकूण ५ प्रकारच्या असतात. १. दीर्घ संधि २. गुण संधि ३. वृद्धि संधि ४. यण संधि ५. अयादि संधि

१. दीर्घ संधि - जेव्हा दोन स्वरांच्या मिलनात नवीन दीर्घ स्वराचा विकार होतो, त्यास दीर्घ संधी असे म्हणतात.

               सूत्र - अकः सवर्णे दीर्घः 
               अर्थ - अक प्रत्ययातील वर्ण म्हणजे अ, इ, उ, ऋ आणि लृ या स्वरांच्या पुढे तेच स्वर आले असता दोहोंच्या जागी एकाच दीर्घ स्वराचा आदेश होतो. 
                        अ + अ = आ 
            किंवा     इ + इ = ई 
           उदाहरण - श्री + ईशः  = श्रीशः 

२. गुण संधि - जेव्ह दोन स्वरन्च्या मीलनात दोन वर्णंचा गुण होतो, त्यास गुण संधि असे म्हणतात.

               सूत्र १ - आद् गुणः 
               अर्थ - अ वर्णाच्या पुढे कोणताही विजातीय वर्ण ( इ, ई, उ, ऊ ) आला असता संधिरूपात एकाच स्वर ( ए किंवा ओ ) आदेश होतो. 
                        त्यास गुण होणे असेही म्हणतात. 
                        अ + इ = ए 
               किंवा  अ + उ = ओ 
               उदाहरण - गङ्गा  + उदकम् = गङ्गोदकम् 
               
                सूत्र २ - उरण रपरः 
                अर्थ - जेव्हा अ, इ, उच्या समोर ऋ हा स्वर येतो तेव्हा अ, इ, उ हे स्वर र् ला पुढे घेऊन जातात आणि अर्, इर्, व उर् असे होतात.
                         अ + ऋ = अर् 
                उदाहरण - कृष्ण + ऋद्धिः = कृष्णर्द्धिः 

३. वृद्धि संधि - जेव्हा दोन स्वरांच्या मिलनात वृद्धी झालेला स्वर आदेशित होतो, त्यास वृद्धी संधी असे म्हणतात.

                सूत्र - वृद्धिंरेचि 
                अर्थ - अ किंवा आच्या समोर ए किंवा ऐ आला तर ऐ आदेश होतो आणि अ, आच्या समोर ओ किंवा औ आला तर औ आदेश होतो. यास वृद्धी होणे असे म्हणतात. 
                उदाहरण - कृष्ण + एकत्वम् = कृष्णैकत्वम् 

४. यण संधि - इक् प्रत्यहरतिल स्वरासमोर कोणताही विजातीय स्वर आला तर यण प्रत्याहारातील वर्ण आदेशित होतो.

               सूत्र - इको यणचि 
               अर्थ - स्वर संधि करताना इ, उ, ऋ आणि लृ या स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास अनुक्रमे य्, व्, र् आणि ल् हे वर्ण आदेशित होतात.
                        इ + उ = यु 
               उदाहरण -  सूत्रेषु + अद्रुष्टं = सूत्रेश्वद्रुष्टं 

५. अयादि संधि - संधि करत असताना एच् प्रत्याहारातील स्वारासमोर कोणताही स्वर आला तर अयादि आदेश होतो.

               सूत्र - एचोयवायावः 
               अर्थ - ए, ओ, ऐ आणि औ या स्वारांसमोर कोणताही स्वर आल्यास अनुक्रमे अय्, अव्, आय् आणि आव् अस आदेश होतो.
                       ओ + ए = अये 
               उदाहरण - नै + अकः = नायकः 

या ५ प्रकारच्या संधिंना स्वर संधि असे म्हणतात. यात महत्त्वाचे म्हणजे ज्या दोन वर्णांची संधि करायची आहे ते दोन्हीही स्वर असणे आवश्यक आहे. " अच् " प्रत्याहारातील वर्ण हे स्वर वर्ण आहेत. म्हणून या संधीस " अच् संधि " असेही म्हणतात.