Jump to content

लखनौ लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लखनौ लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहरामध्ये असलेला हा मतदारसंघ १९९१ सालापासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

२०१४ लोकसभा निवडणुकांपासून भाजपचे पक्षनेते राजनाथ सिंह हे लखनौमधून निवडून येत आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ लखनौ मध्ये खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ लखनौ पश्चिम लखनौ
२ लखनौ उत्तर
३ लखनौ पूर्व
४ लखनौ मध्य
५ लखनौ छावणी

खासदार

[संपादन]
भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर येथून सलग पाच वेळा निवडून आले होते.
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९५२ पहिली विजयालक्ष्मी पंडित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५५ ^ शोराजवती नेहरू
१९५७ दुसरी पुलिन बिहारी बॅनर्जी
१९६२ तिसरी बी.के. धौन
१९६७ चौथी आनंद नारायण मुल्ला अपक्ष
१९७१ पाचवी शीला कौल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७७ सहावी हेमवतीनंदन बहुगुणा जनता पक्ष
१९८० सातवी शीला कौल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८४ आठवी
१९८९ नववी मंधता सिंह जनता दल
१९९१ दहावी अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष
१९९६ अकरावी
१९९८ बारावी
१९९९ तेरावी
२००४ चौदावी
२००९ पंधरावी लालजी टंडन
२०१४ सोळावी राजनाथ सिंह
२०१९ सतरावी
२०२४ अठरावी

हे सुद्धा पहा

[संपादन]