लक्ष्मी गौतम
Indian woman who cares for abandonned widows | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | c. इ.स. १९६३ वृंदावन | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
नियोक्ता |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
लक्ष्मी गौतम (जन्म: सुमारे १९६३) ही एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ असून, ती परित्यक्त विधवांसाठी काम करते. तिला "वृंदावनाची देवदूत" म्हटले जाते. २०१५ मध्ये तिला तिच्या या कामाची दखल घेऊन नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ती वृंदावनमधील प्राच्य तत्वज्ञान संस्थेत शिकवते.
जीवन
[संपादन]गौतमचा जन्म सुमारे १९६३ मध्ये वृंदावनमध्ये झाला.[१] तिने डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा येथून हिंदी आणि इतिहासाचा अभ्यास केला आणि विद्यावाचस्पतीची पदवी मिळवली. त्यानंतर ती वृंदावन येथील प्राच्य तत्वज्ञान संस्थेत सहयोगी प्राध्यापक झाली.[१]
लहानपणीच तिला असे माहित झाले की मुंडण केलेल्या पांढऱ्या पोशाखातील महिला विधवा असतात. बाल वधू तरुण होण्यापूर्वीच विधवा देखील होऊ शकतात. त्यानंतर त्यांचे उर्वरित आयुष्य आदरहीन, दुर्लक्षित, तसेच परित्यक्त विधवा म्हणून संपू शकते.[१] १९९५ मध्ये त्या वृंदावन येथील उपमहापौर होत्या.[२]
गौतमने विधवांच्या दुर्दशेबद्दल काहीतरी सकारात्मक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने २०१३ मध्ये[३] एक गैर सरकारी सामाजिक संस्था स्थापन केली. बहुतेक विधवा ह्या निराधार बनून मरतात. तर काही तरुण विधवा जगण्यासाठी वेश्या बनतात.[२]
गौतम परित्यक्त विधवांच्या मृतदेहाच्या शोधात असते.[४] ती मृतदेह गोळा करून त्यांचे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करते. ती केवळ मृत विधवांची काळजी करत नाही, तर तिने स्थापन केलेली संस्था सोडून दिलेल्या विधवांची देखभाल करते. या संस्थेच्या आधारावर तिच्या पस्तीस विधवा व्यवस्थित जीवन जगत आहेत. या संस्थेनेलैंगिक शोषणाचला ळींकपडलेल्या महिलाना कायदेशीर आणि भावनिक आधार देखील दिला आहे.[२]
२०१५ मध्ये तिच्या या कामाची दखल घेऊन तिला नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यात असे नमूद करण्यात आले की तिने दिवसेंदिवस कुजलेल्या मृतदेहांची हाताळणी केली आणि तिने ५०० मृतदेहांवर अंतिम संस्कार केले. तथापि, हा पुरस्कार मृत आणि जिवंत लोकांची काळजी घेतल्याबद्दल होता कारण तिने अन्न पाणी आणि ब्लँकेटची व्यवस्था केली होती.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c "Committed to the welfare of Vrindavan widows". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-05-17. 2020-07-01 रोजी पाहिले.
- ^ a b c Codingest (2018-06-06). "Dr. Lakshmi Gautam helps sadhvi escape an endless cycle of abuse". Vrindavan Today (इंग्रजी भाषेत). 2020-07-01 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Dr. Laxmi Gautam | WEF | Women Economic Forum". WEF (इंग्रजी भाषेत). 2020-07-01 रोजी पाहिले.
- ^ Madhukalya, Amrita (2015-03-09). "Angel of Vrindavan: Dr Laxmi Gautam gets Nari Shakti Puraskar for her dedication to widows' welfare". DNA India (इंग्रजी भाषेत). 2020-07-01 रोजी पाहिले.
- ^ "India's Ministry of Women, children and development". Twitter (इंग्रजी भाषेत). 2020-07-01 रोजी पाहिले.