Jump to content

लक्ष्मीनृसिंह मंदिर (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर हे पुण्यातील पेशवेकालीन एक मंदिर आहे. ते ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे.

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर, पुणे (सप्टेंबर २०२५ मधील छायाचित्र )

स्थापना

[संपादन]

आषाढ शुद्ध १०, शके १६९६ मध्ये म्हणजे इ.स. १९७४ मध्ये वेदशास्त्र संपन्न गणेशभट्ट जोशी यांनी या मंदिराची स्थापना केली. १४२०, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे हे मंदिर आहे.

ऐतिहासिक महत्त्व

[संपादन]

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके इ.स.१८६५ ते १८७९ या कालावधीत या मंदिराच्या वाड्यात राहत असत.[] महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांपैकी एक असणारे वामन प्रभाकर भावे हे देखील याच वाड्यात राहत असत. येथेच फडके आणि भावे यांच्या विचारविनिमायातून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली.[]

तसेच समर्थ रामदासभक्त असणारे श्रीधर स्वामी इ.स. १९२४ ते १९२६ या कालावधीत या मंदिराच्या वाड्यात राहत असत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b श्री लक्ष्मीनृसिंह मंदिरावरील नीलफलक
  2. ^ ध्यासपंथे चालता, (महाराष्ट्र एज्युकेशन सोसायातीचा इतिहास), प्रकाशन वर्ष - २०२२