लंडनचे धुकेसंकट
|
धुक्याने वेढलेला नेल्सन्स कॉलम | |
| तारीख | ५–९ डिसेंबर १९५२ |
|---|---|
| स्थान | लंडन, इंग्लंड |
| Coordinates | 51°30′N 0°12′W / 51.5°N 0.2°W[१] |
| Casualties | |
| १,०,००० प्रभावित (१९५२मधील सरकारी अंदाज)[२] | |
| असंख्य इतर रोगांनी ग्रस्त | |
| मृतांची संख्या | |
लंडनचे धुकेसंकट किंवा द ग्रेट स्मॉग ऑफ लंडन ही डिसेंबर १९५२ मध्ये इंग्लंडची राजधानी लंडनमधील वायू प्रदूषण घटना होती. १९५२. असामान्य थंड हवामानाचा काळ, त्यावेळी आलेले अँटीसायक्लोन आणि थंडावलेल्या वाऱ्यामुळे शहरावर दाट धूर आणि धुके पसरले. हे धुके आणि धूर शुक्रवार, ५ डिसेंबर ते मंगळवार, ९ डिसेंबर पर्यंत शहरावर दाटून राहिले व शेवटी वारे सुटल्यानंतर पांगले. [४] [५]
लंडनमध्ये किमान १३ व्या शतकापासून प्रदूषण मोठी समस्या आहे. [६] [७] १६६१पासून या बद्दलच्या नोंदी आहेत.[८] त्यातही हे संकट तोपर्यंतच्या कोणत्याही प्रदूषणापेक्षा अनेक पटीने वाईट होते. फक्त लंडन नव्हे तर युनायटेड किंग्डमच्या इतिहासातील ही सर्वात वाईट वायू प्रदूषण घटना मानली जाते. [९] यानंतर पर्यावरणीय संशोधन, सरकारी नियमन आणि हवेची गुणवत्ता आणि आरोग्य यांच्यातील संबंधांबद्दल जनजागृती होउन [२] [८] यामुळे युनायटेड किंग्डममधील नियम आणि कायद्यांबध्ये अनेक बदल झाले, ज्यात स्वच्छ हवा कायदा १९५६ समाविष्ट आहे. [१०] [११]
५ तारखेला धुके पसरण्यास सुरुवात झाली तेव्हा जनतेने किंवा सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत लंडन अशा धुक्यासाठी कुप्रसिद्ध आहे. [१२] या वेळेसचे धुके मात्र "मटार-सूपर" पेक्षा जास्त दाट होते आणि पटकन विरत नव्हते. [१३] शहरात काही मीटर पलीकडे दिसणे अशक्य झाले होते [१४] आणि त्यामुळे गाडी चालवणे कठीण/अशक्य झाले. [१५]
जसजसे हे धुके पसरु लागले तसे लंडन अंडरग्राउंड व्यतिरिक्त शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आल्या. वाहन अपघातांच्या संख्येमुळे रुग्णवाहिका सेवांवर मोठा ताण आला होता. [१६] [१७] धुके इतके दाट होते की ते इमारतींच्या आतही शिरले, परिणामी संगीत कार्यक्रम आणि चित्रपटांचे प्रदर्शन रद्द करण्यात आले. चित्रपटगृह आणि नाट्यगृहांतील मंच आणि पडदेसुद्धा दिसणे कठीण झाले. [११] [१६] मैदानी क्रीडा स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या. [१७]
धुके विरल्यानंतरच्या आठवड्यात वैद्यकीय सेवांनी संकलित केलेल्या आकडेवारीत असे आढळून आले की धुक्यामुळे ४,००० लोकांचा मृत्यू झाला. बळी पडलेल्यांपैकी बरेच जण अगदी लहान किंवा वृद्ध होते, किंवा त्यांना आधीच श्वसन किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या आणि रोग होते. [१८] फेब्रुवारी १९५३ मध्ये, कामगार पक्षाचे खासदार मार्कस लिप्टन यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये असे सुचवले की धुक्यामुळे ६,००० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि त्या काळात लंडनमध्ये २५,००० पेक्षा जास्त लोकांना इलाजाची गरज पडली.
धुक्यानंतरही अनेक महिने लंडनमधील मृत्युदर नेहमीपेक्षा अधिक होता. [१९] एका प्राथमिक अहवालात (जो कधीही अंतिम झाला नाही) त्या मृत्यूंना इन्फ्लूएंझा साथीमुळे झाल्याचे ठरविण्यात आले. [२] यात अगदी थोडे तथ्य होते. [२०] सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागातील वातावरणीय प्रदूषणाचे प्रभारी अधिकारी म्हणून त्या वेळी यूकेचे सर्वोच्च प्रदूषण तज्ञ असलेले ईटी विल्किन्स यांनी डिसेंबर १९५२ ते मार्च १९५३ या कालावधीसाठी वाढीव मृत्युदरांचा आराखडा तयार केला असता असे आढळून आले की सुरुवातीला मोजलेल्या मृत्यूंपेक्षा जास्त ८,००० मृत्यू झाले आहेत. त्याजोगे एकूण १२,००० मृत्यू झाले असल्याचे लक्षात आले. [२१] [२२] [२३] बहुतेक मृत्यू श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे, हायपोक्सियामुळे आणि धुक्यामुळे झालेल्या फुफ्फुसांच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या सर्दी, यांकारणे झालेल्या हवेच्या मार्गांमधील अडथळ्यांनी झाले. [२४] [२५] फुफ्फुसांचे संक्रमण प्रामुख्याने ब्रोन्कोन्यूमोनिया किंवा तीव्र ब्राँकायटिस होते. [२६] [२७]
ही १२,००० मृत्यूंची संख्या त्यावेळच्या सरकारी एकूण संख्येपेक्षा तीन ते चार पट जास्त होती परंतु विल्किन्सच्या मूळ अंदाजाच्या अगदी जवळ होती. [२] [३] [२२] या धुक्यामुळे गर्भातील किंवा अर्भक असलेल्या व्यक्तींची बुद्धिमत्ता कमी होण्याची आणि त्यांच्या समवयस्कांपेक्षा श्वसनआरोग्य खराब होण्याचीही भीती होती. [१]
या संकटानंतर १९५२ पासून युनायटेड किंग्डममध्ये अनेक पर्यावरणीय कायदे लागू केले गेले. यांत लंडन शहर (विविध अधिकार) कायदा १९५४ तसेच १९५६ आणि १९६८ चे स्वच्छ हवा कायदे होते. यांमुळे लंडनमधील वायू प्रदूषणात घट होण्यास मदत झाली. [११] लंडनमधील रहिवाशांना कोळशाच्या उघड्या शेकोट्यांऐवजी पर्यायी (जसे की गॅस शेकोटी) शेकोट्या वापरण्यासाठी किंवा कमीत कमी धूर निर्माण करणाऱ्या शेकोट्या विकत घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. त्यावेळी बहुतेक घरांमध्ये मध्यवर्ती उष्मा असणे (गॅस, वीज, तेल किंवा परवानगी असलेल्या घन इंधनाचा वापर) दुर्मिळ होते, १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धा नंतर हे प्रचलित झाले. या सुधारणा असतानाही दहा वर्षांनंतर, डिसेंबर १९६२ च्या सुरुवातीला आणखी एक धुक्याचे संकट लंडनवर आलेच होते. [२८]
संदर्भ
[संपादन]- 1 2 von Hinke, Stephanie; Sørensen, Emil N. (December 2023). "The long-term effects of early-life pollution exposure: Evidence from the London smog". Journal of Health Economics. 92. arXiv:2202.11785. doi:10.1016/j.jhealeco.2023.102827. ISSN 0167-6296. PMID 37866291 Check
|pmid=value (सहाय्य). - 1 2 3 4 5 6 Bell, M.L.; Davis, D.L.; Fletcher, T. (2004). "A Retrospective Assessment of Mortality from the London Smog Episode of 1952: The Role of Influenza and Pollution". Environ Health Perspect. 112 (1, January): 6–8. Bibcode:2004EnvHP.112....6B. doi:10.1289/ehp.6539. PMC 1241789. PMID 14698923. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "EHP_112_1" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - 1 2 Stone, R (2002). "Counting the Cost of London's Killer Smog". Science. 298 (5601): 2106–2107. Bibcode:2002Sci...298.2106S. doi:10.1126/science.298.5601.2106b. PMID 12481106.
- ↑ "The Great Smog of 1952". metoffice.gov.uk. 3 September 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 October 2014 रोजी पाहिले.
- ↑ "1952: London fog clears after days of chaos". BBC News. 9 December 1952. 28 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ "1952: London fog clears after days of chaos". BBC News. 9 December 1952. 28 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ Brimblecombe, Peter (1987). The Big Smoke: A History of Air Pollution in London Since Medieval Times. Methuen. p. 7. ISBN 1-136-70329-2. 20 September 2021 रोजी पाहिले.
- 1 2 Evelyn, John (1976). Fumifugium, or, The Inconveniencie of the Aer and Smoak of London. London: W. Godbid. ISBN 978-0-904617-06-1. 1 April 2022 रोजी पाहिले.
- ↑ McKie, Robin; Townsend, Mark (24 November 2002). "Great Smog is history, but foul air still kills". The Observer.
- ↑ Excell, John (22 December 2015). "The lethal effects of London fog". BBC News. 30 March 2023 रोजी पाहिले.
- 1 2 3 Brimblecombe, Peter (1 November 2006). "The Clean Air Act after 50 years". Weather. 61 (11): 311–314. Bibcode:2006Wthr...61..311B. doi:10.1256/wea.127.06. eISSN 1477-8696. ISSN 0043-1656. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "Brimblecombe2006" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ Dawson, Kate Winkler (2017). Death in the Air: The True Story of a Serial Killer, the Great London Smog, and the Strangling of a City. Hachette Books. p. 158. ISBN 978-0-316-50685-4.
These [death toll] numbers were startling, but they still caused no panic... A city hardened by war still believed the fog was simply a prolonged peasouper, just another byproduct of living in London.
- ↑ 50 years on: The struggle for air quality in London since the great smog of December 1952 (PDF). Greater London Authority. December 2002. ISBN 1-85261-428-5. 19 July 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 28 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ Nielson, John (11 December 2002). "The Killer Fog of '52". NPR. 14 December 2013 रोजी पाहिले.
- ↑ "Days of toxic darkness". BBC News. 5 December 2002. 28 March 2023 रोजी पाहिले.
- 1 2 "London fog clears after days of chaos". BBC News. 9 December 1952. 7 December 2014 रोजी पाहिले.
- 1 2 "Busy Time for Thieves: Traffic Disrupted". The Guardian. 6 April 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Death by smog: London's fatal four-day pea-souper: Interview with Dr Brian Commins". BBC News. 2 April 2023 रोजी पाहिले.
As many as 100,000 people in London were made ill by the pollution at the time, particularly people with asthma and cardiovascular problems. The very young and the elderly also suffered.
- ↑ Beaver, Hugh (December 1953). "Great Britain Committee on Air Pollution: Interim Report". London: HMSO. pp. 17–18. 6 April 2023 रोजी पाहिले.
- ↑ Davis, Devra (2003). When Smoke Ran Like Water: Tales Of Environmental Deception And The Battle Against Pollution. Basic Books. ISBN 978-0-465-01522-1. 2 April 2023 रोजी पाहिले.
- ↑ Wilkins, E.T. (January 1954). "Air Pollution and the London Fog of December, 1952". Journal of the Royal Sanitary Institute. 74 (1): 1–21. doi:10.1177/146642405407400101. ISSN 0370-7334. PMID 13118590.
- 1 2 Fuller, Gary (2018). "3: The Great Smog". The Invisible Killer: The Rising Global Threat of Air Pollution- and How We Can Fight Back. Melville House. pp. 43–44. ISBN 978-1-61219-783-8. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "fullergls" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ Beaver, Hugh (December 1953). "Great Britain Committee on Air Pollution: Interim Report". London: HMSO. p. 19. 6 April 2023 रोजी पाहिले.
- ↑ Peters, Annette; Döring, Angela; Wichmann, H-Erich; Koenig, Wolfgang (May 1997). "Increased plasma viscosity during an air pollution episode: a link to mortality?". The Lancet. 349 (9065): 1582–1587. doi:10.1016/S0140-6736(97)01211-7. ISSN 0140-6736. PMID 9174559.
- ↑ Bell, Michelle L.; Davis, Devra Lee (June 2001). "Reassessment of the Lethal London Fog of 1952: Novel Indicators of Acute and Chronic Consequences of Acute Exposure to Air Pollution". Environmental Health Perspectives. 109 (Suppl 3): 389–394. Bibcode:2001EnvHP.109..389B. doi:10.2307/3434786. JSTOR 3434786. PMC 1240556. PMID 11427388.
- ↑ Camps, Francis E (Ed.) (1976). Gradwohl's Legal Medicine (Bristol: John Wright & Sons Ltd, 3rd ed.) आयएसबीएन 0-7236-0310-3. p. 236.
- ↑ "1952: London fog clears after days of chaos". BBC News. 9 December 1952. 28 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ "1952: London fog clears after days of chaos". BBC News. 9 December 1952. 28 March 2023 रोजी पाहिले.