लंकिणी
लंकिणी किंवा लंकिनी ही प्राचीन हिंदू महाकाव्य रामायणातील एक शक्तिशाली राक्षसी होती. तिच्या नावाचा शब्दशः अर्थ "लंकेची स्त्री" असा होतो कारण ती लंका शहराची स्त्री रूप होती आणि लंकेच्या दारांची संरक्षक होती.[१]
कथा
[संपादन]रामायणानुसार, लंकिणी एकेकाळी ब्रह्मदेवाच्या निवासस्थानाची रक्षणकर्ता होती. तेथे रक्षण करताना, तिला तिच्या पदाबद्दल गर्व आणि अभिमान वाटू लागला. तिने इतरांशी तुच्छतेने वागण्यास सुरुवात केली ज्यामुळे ब्रह्मदेवाने तिला राक्षसांच्या नगरीचे कायमचे रक्षण करण्याचा शाप दिला. लंकिणीला तिची चूक कळली आणि तिने क्षमा मागितली. तथापि, ब्रह्मदेवाला शाप परत घेणे शक्य नव्हते, आणि त्याऐवजी तिला उःशाप दिला की जेव्हा एक वानर तिला युद्धात पराभूत करेल तेव्हाच ती शापातून मुक्त होईल.[१]
रामायणात, सीतेचा शोध घेण्याचे काम हनुमानाला सोपवण्यात आले तेव्हा तो लंकेच्या वेशीवर लंकिणीला भेटला. लंकिणीने त्याला त्याची ओळख आणि भेटीचा उद्देश विचारला तेव्हा, हनुमानाने हुशारीने उत्तर दिले की तो प्रसिद्ध लंका शहर आणि तिचे सौंदर्य पाहण्यासाठी जंगलातून आला आहे. तथापि, लंकिणीला कळले की तो एक घुसखोर आहे आणि ती त्याच्यावर हल्ला करते. ती एक स्त्री आहे हे लक्षात घेऊन, हनुमान तिच्या पाठीवर हळूवारपणे प्रहार करतो जेणेकरून ती पडेते आणि तिला जखम होते. स्तब्ध आणि गोंधळलेल्या लंकिणीला लगेच कळते की तिचा विरोधक फक्त माकड नव्हता आणि ब्रह्मदेवाची भविष्यवाणी खरी ठरली आहे हे जाणून ती क्षमा मागते. लंकिणी शापमुक्त होते व हनुमान लंकेत सीतेचा शोध सुरू ठेवतो.[२][३]
संदर्भ
[संपादन]- 1 2 Kishore, B.R. (1995). Ramayana. Diamond Pocket Books. ISBN 9789350837467. 2017-01-08 रोजी पाहिले.
- ↑ Ramayan: India's Classic Story of Divine Love: P. R. Mitchell: 9780595507634: Amazon.com: Books. February 2009. ISBN 978-0595507634.
- ↑ Pattanaik, Devdutt (2015). The Book of Ram. ISBN 978-0143065289.
