रोहित पाटील
| रोहित आर.आर.पाटील | |
सदस्य, विधानसभा | |
| मुख्यमंत्री | देवेंद्र फडणवीस |
|---|---|
| मतदारसंघ | तासगांव-कवठे महांकाळ |
| जन्म | ४ जुलै, १९९९ |
| राजकीय पक्ष | राष्ट्रवादी (SP) |
| आई | सुमन पाटील |
| वडील | आर.आर. पाटील |
रोहित रावसाहेब पाटील (४ जुलै, १९९९ - ) हे महाराष्ट्रातील एक -भारतीय राजकारणी आहेत. हे२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले. [१]त्यावेळी श्रीयुत रोहित पाटील हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण सदस्य होते.[२]
पाटील यांचा जन्म महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील आणि सुमन पाटील यांच्या पोटी झाला. [३] त्यांनी मुंबईतील एनएमआयएमएस येथून बीबीए पूर्ण केले. [४]
पाटील यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे निवडणूक लढवली. त्यांना १२८,४०३ मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि सांगलीचे माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजयकाका पाटील यांचा २७,६४४ मतांनी पराभव केला. [४] [५] संजयकाका हे त्यांच्या वडिलांचे जुने प्रतिस्पर्धी आहेत. [६]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Tasgaon - Kavathe Mahankal Election Result 2024 LIVE: Rohit Suman R.R. Aba Patil of NCPSP Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-11-29 रोजी पाहिले.
- ↑ "11 next-gen debutants script victory; Rohit Patil becomes youngest MLA". The Times of India. 2024-11-24. ISSN 0971-8257. 2025-01-06 रोजी पाहिले.
- ↑ "11 next-gen debutants script victory; Rohit Patil becomes youngest MLA". The Times of India. 2024-11-24. ISSN 0971-8257. 2024-11-29 रोजी पाहिले.
- 1 2 "Rohit R. Patil S/O R R Patil(Independent(IND)):Constituency- TASGAON-KAVATHE MAHANKAL(SANGLI) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-11-29 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ "Rohit Patil Won Tasgaon Kavathe Mahankal Election : महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; एकेकाळी वडील होते गृहमंत्री, आज लेकाने मारली बाजी | Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : Rohit Patil Won Tasgaon Kavathe Mahankal Assembly Constituency". Loksatta. 2024-11-23. 2024-11-29 रोजी पाहिले.
- ↑ "Tasgaon Kavathe Mahankal (Maharashtra) Assembly Election Results 2024 Live: Winner, Runner-up, Candidates List". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-11-29 रोजी पाहिले.