Jump to content

रोमा टर्मिनी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्थानक तपशील
गुणक नकाशावर टिचकी द्या
स्थानकाचा आतील भाग
कॉन्कोर्स क्षेत्र

रोमा टर्मिनी ( इटालियन: स्ताझ्झिओनी तर्मिनी) (आहसंवि: XRJ) हे इटलीची राजधानी रोम शहराचे मुख्य रेल्वे स्थानक आहे. [] [] हे इटलीचे सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे आणि युरोपमधील पाचवे सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे, दरवर्षी येथे अंदाजे १५ कोटी प्रवासी येतात, [] आणि दररोज ८५० गाड्या ये-जा करतात. []

सुरक्षेसाठी फलाट आणि कॉन्कोर्स क्षेत्र तिकीट गेटने वेगळे केले आहे.

या स्थानकावरून इटलीतील सर्व प्रमुख शहरांना नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहे, तसेच म्युनिक, जिनीव्हा आणि व्हिएन्नाला रोज आंतरराष्ट्रीय सेवा देखील उपलब्ध आहेत. दरवर्षी १५ कोटी प्रवासी रोमा टर्मिनी वापरतात आणि दररोज ८५० गाड्या स्टेशनमधून ये-जा करतात. [] ३२ फलाट असलेले [] रोमा टर्मिनी हे युरोपमधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. पॅरिसच्या गारे दु नॉर्द आणि म्युनिकच्या म्युंशेन एचबीएफ स्थानकांमधूनही प्रत्येकी ३२ फलाट आहेत. जोडलेले आहे. []

रोमा टर्मिनी रोममधील सार्वजनिक वाहतुकीचे सुद्धा मुख्य केंद्र आहे. टर्मिनी मेट्रो स्थानकावर दोन रोम मेट्रो सेवा (अ आणि ब) एकमेकांना छेदतात. स्थानकासमोरील पियाझा देई चिंक्वेचेंतो येथे शहराचे प्रमुख बस स्थानक आहे. शहराच्या मुख्य ट्राम सेवा स्थानकापासून १.५ किमी अंतरावार पोर्ता मॅजिओरे येथे आहेत

२३ डिसेंबर २००६ रोजी, हे स्टेशन पोप जॉन पॉल दुसरे यांना समर्पित करण्यात आले. []

स्थानिक रेल्वे व ट्रॅम वाहतूक

[संपादन]
  • MetropolitanaMetropolitana रोम मेट्रोवरील आणि ब मार्गिकांसाठी टर्मिनी हे जंक्शन आहे.
  • Metropolitana रोम-ज्यार्दिनेत्ती रेल्वेवरील रोमा लाझियाली स्थानक.
  • public transportation ५ – १४ (ट्राम लाईन) – एच – ३८ – ४० एक्सप्रेस – ६४ – ६६ – ७० – ७५ – ८२ – ९० एक्सप्रेस – ९२ – १०५ – १५० एफ – २२३ – ३१० – ५९० – ७१४ – ९१० – एनएमए – एनएमबी – एनएमबी१ – एन५ – एन८ – एन११ – एन४६ – एन६६ – एन७० – एन९२ – एन९८ – एन५४३ – एन७१६ – सी२ – सी३

रेल्वे सेवा

[संपादन]

निवडक रेल्वे सेवा:

  • शहर जोडणारी सेवा
  • युरोनाइट (रातराणी)
  • इंटरसिटी नॉत्ते (रातराणी)
  • प्रादेशिक सेवा

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Guida d'Italia. Roma. Milan: Touring Club Italiano. 1999. p. 162.: "il toponimo deriva dalle terme di Diocleziano" ("the toponym derives from the Baths of Diocletian").
  2. ^ "Piazza di Termini: A Timeline of Urban Development".
  3. ^ "The Busiest Railway Stations In Europe". 28 August 2017.
  4. ^ "Roma Termini, Grandi Stazioni Rail" (इटालियन भाषेत).
  5. ^ a b "Roma Termini" (Italian भाषेत). Grandi Stazioni. 2017. 1 September 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "termini" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  6. ^ "Trains to Roma Termini". Trainline. 16 November 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Europe's Record-Holding Railway Stations". worldatlas.com. 23 October 2017. 1 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 November 2023 रोजी पाहिले.