रोबोकॉन इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोबोकाॅन इंडिया २०१७, पुणे

आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन (ABU) द्वारे रोबोकॉन (रोबोटिक काॅनटेस्टचे संक्षिप्त) आयोजित केले जाते, जो आशिया पॅसिफिक प्रदेशातील २० हून अधिक देशांचा समुह आहे. जपान याआधीच राष्ट्रीय स्तरावर अशा स्पर्धा आयोजित करत आहे आणि २००२ मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेचे यजमान देखील बनले आहे. तेव्हापासून, दरवर्षी सदस्य प्रसारकांपैकी एक या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करतो.

प्रत्येक सहभागी देशाचे प्रसारक( broadcasters ) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करतील अशा संघाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करतात. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. सहभागी संघांनी त्यांच्या स्वतःच्या रोबोटची रचना आणि निर्मिती करणे अपेक्षित आहे,आणि प्रशिक्षक, टीम लीडर, मॅन्युअल रोबोट ऑपरेटर आणि स्वयंचलित रोबोट ऑपरेटरसह त्यांचे संघ तयार करणे.

दूरदर्शन, राष्ट्रीय सार्वजनिक सेवा प्रसारक दरवर्षी राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धा आयोजित करते आणि विजेत्या संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. २००२ मध्ये पहिली रोबोकॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये आयआयटी कानपूरमध्ये तीन महाविद्यालयातील फक्त चार संघ सहभागी झाले होते. बालेवाडी, पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग मैदानात झालेल्या इंडियन नॅशनल रोबोकॉन २०१२ मध्ये ही संख्या ६६ आणि २०१८ मध्ये १०७ वर पोहोचली होती. २००८ आणि २०१४ मध्ये भारत हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा यजमान होता. २०२२ मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे दूरदर्शन आणि आयआयटी दिल्ली यांनी नवी दिल्ली येथे केले आहे.

स्पर्धा[संपादन]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


वर्ष यजमान शहर आयोजक थीम आंतरराष्ट्रीय विजेता भारत राष्ट्रीय विजेता[१][२] भारतीय स्पर्धा सह आयोजित[१][२]
२००२ जपान टोकियो, जपान NHK Reach for the Top of Mount Fuji व्हियेतनाम हो ची मिन्ह सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ आयआयटी कानपूर
२००३ थायलंड बँकॉक, थायलंड MCOT Takraw Space Conqueror थायलंड Sawangdandin Industrial and Community Education College भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ निरमा विद्यापीठ, अहमदाबाद
२००४ दक्षिण कोरिया सोल, दक्षिण कोरिया KBS Reunion of Separated Lovers, Gyeonwoo & Jiknyeo व्हियेतनाम हो ची मिन्ह सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी भारत विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी निरमा विद्यापीठ, अहमदाबाद
२००५ चीन बीजिंग, चीन चायना सेंट्रल टेलिव्हिजन Climb on the Great Wall Light the Holy Fire जपान टोकियो विद्यापीठ भारत आयआयटी मुंबई एमआयटी, कोथरूड पुणे
२००६ मलेशिया क्वालालंपुर, मलेशिया RTM Building the World's Tallest Twin Tower व्हियेतनाम हो ची मिन्ह सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी, कोथरूड पुणे
२००७ व्हियेतनाम हनोई, व्हियेतनाम व्हिएतनाम टेलिव्हिजन (VTV) Halong Bay Discovery चीन शिआन जिओटाॅंग विद्यापीठ भारत आयआयटी दिल्ली एमआयटी, कोथरूड पुणे
२००८ भारत पुणे, भारत दूरदर्शन गोविंदा चीन शिआन जिओटाॅंग विद्यापीठ भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी, कोथरूड पुणे
२००९ जपान टोकियो, जपान NHK Travel Together for the Victory Drums चीन Harbin Institute of Technology भारत आयआयटी मद्रास एमआयटी स्कुल ऑफ टेक्निकल मॅनेजमेंट, पुणे आणि एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१० इजिप्त कैरो, इजिप्त ERTU Robo-Pharaohs built pyramids चीन University of Electronic Science and Technology of China भारत एमआयटी पुणे एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०११ थायलंड बँकॉक, थायलंड MCOT Loy Krathong, Lightning Happiness with friendship थायलंड Dhurakij Pundit University भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१२ हाँग काँग हाँगकाँग RTHK Peng On Dai Gat (In pursuit of peace and prosperity) चीन University of Electronic Science and Technology of China भारत एमआयटी पुणे[३] एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१३ व्हियेतनाम दा नांग, व्हियेतनाम व्हिएतनाम टेलिव्हिजन (VTV) द ग्रीन प्लॅनेट जपान Kanazawa Institute of Technology भारत एमआयटी पुणे एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१४ भारत पुणे, भारत दूरदर्शन ए सल्युट फाॅर पॅरेंटहुड (पालकत्वाला सलाम) व्हियेतनाम लॅक हाँग युनिवर्सिटी भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१५ इंडोनेशिया योगकर्ता, इंडोनेशिया इंडोनेशिया बॅडमिंटन व्हियेतनाम Hung Yen University of Technology and Education भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१६ थायलंड बँकॉक, थायलंड Modernine TV/MCO क्लीन एनर्जी रिचार्जिंग द वर्ल्ड मलेशिया Universiti Teknologi Malaysia भारत वडोदरा अभियांत्रिकी महाविद्यालय, कोटंबी, वडोदरा एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१७ जपानटोकियो, जपान NHK द लॅंडिंग डिस्क[४] व्हियेतनाम लॅक हाँग युनिवर्सिटी भारत अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (CoEP) एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१८ व्हियेतनाम निन्ह बिन्ह, व्हियेतनाम व्हिएतनाम टेलिव्हिजन (VTV) द फ्लाइंग ड्रॅगन व्हियेतनाम लॅक हाँग युनिवर्सिटी भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
२०१९ मंगोलिया उलानबातर, मंगोलिया[५] Mongolian National Broadcaster ग्रेट उर्तु हाँग काँग द चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग भारत लालभाई दलपतभाई अभियांत्रिकी महाविद्यालय, अहमदाबाद (LDCE) आयआयटी दिल्ली
२०२० फिजी सुवा, फिजी रोबो रग्बी ७s जपान टोकियो विद्यापीठ (कोविड-१९ महामारीमुळे ऑनलाइन स्पर्धा झाली) भारत एमआयटी पुणे आयआयटी दिल्ली
२०२१ चीन जिमो, चीन थ्रोईंग अॅरोज् इन्टु पाॅट्स इंडोनेशिया Sepuluh Nopember Institute of Technology (कोविड-१९ महामारीमुळे ऑनलाइन स्पर्धा झाली) भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ आयआयटी दिल्ली
२०२२ भारत नवी दिल्ली, भारत दूरदर्शन लगोरी भारत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, निरमा विद्यापीठ [६] आयआयटी दिल्ली

चित्र दालन[संपादन]

रोबोकाॅन इंडिया २००८
रोबोकाॅन इंडिया २००८  
रोबोकाॅन इंडिया २००९
रोबोकाॅन इंडिया २००९  
रोबोकाॅन इंडिया २०१०
रोबोकाॅन इंडिया २०१०  
रोबोकाॅन इंडिया २०११
रोबोकाॅन इंडिया २०११  
रोबोकाॅन इंडिया २०१३
रोबोकाॅन इंडिया २०१३  
रोबोकाॅन इंडिया २०१७
रोबोकाॅन इंडिया २०१७  
रोबोकाॅन इंडिया २०१८
रोबोकाॅन इंडिया २०१८  
रोबोकाॅन इंडिया २०१९
रोबोकाॅन इंडिया २०१९  


बाह्य दुवे[संपादन]

रोबोकॉन इंडिया

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Wayback Machine (2013-08-31). "History of Robocon India". Archived from the original on 2013-08-31. 2020-06-17 रोजी पाहिले.
  2. ^ a b Wayback Machine (2017-04-24). "History of Robocon India". Archived from the original on 2017-04-24. 2020-06-17 रोजी पाहिले.
  3. ^ Pune institute’s team wins Robocon 2012
  4. ^ ABU ROBOCON 2017 TOKYO THEME & RULEBOOK THE LANDING DISC
  5. ^ "ABU ROBOCON 2019" (PDF). aburobocon2019.mnb.mn/ (इंग्रजी भाषेत). 2019-06-27 रोजी पाहिले.
  6. ^ Jul 18, Shradha Chettri / TNN / Updated:; 2022; Ist, 11:38. "Break and build! Robocon champs eye global glory | Delhi News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-07-19 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)