Jump to content

रोटी प्राटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डावीकडे साधा रोटी प्राटा, मध्यभागी रोटी प्राटा तलूर (अंड्याचा रोटी प्राटा) आणि उजवीकडच्या वाडग्यात चिकन करी

रोटी प्राटा (अन्य नावे: रोती प्रात्ता, रोटी प्राता ; इंग्लिश, भासा मलायू: Roti prata ; चिनी: 印度抛饼 ;) हा मलेशिया, सिंगापूर येथे खाल्ला जाणारा, मैद्यापासून किंवा गव्हापासून बनवला जाणारा चपातीसदृश खाद्यपदार्थ आहे. तव्यावर भाजून बनवला जाणारा हा प्रकार पाकिस्तान, भारत, बांग्लादेश इत्यादी दक्षिण आशियातील देशांत आढळणाऱ्या पराठा किंवा परोठा या खाद्यपदार्थाशी जवळचे साधर्म्य राखून आहे. प्राट्यात भरलेल्या सारणानुसार रोटी प्राट्याचे साधा, अंडा, चीज, कांदा, केळी, अळंबी (मशरूम), रेड बीन असे नानाविध प्रकार प्रचलित आहेत. रोटी प्राट्यासोबत साधारणपणे चिकन, मटण, गोमांस यांची करी किंवा भाज्यांची शाकाहारी करी खातात.

पाकप्रकिया[संपादन]

रोटी प्राटा बनवणारा आचारी

मैद्याच्या किंवा गव्हाच्या कणकेचा गोळा सुरुवातीस चेपून, नंतर त्याला वारंवार हवेत उडवून तव्यावर फैलावत नेतात. या प्रक्रियेने रोटी प्राटा लाटल्याविना किंवा थापल्याविना फैलावत पातळ होतो. रोटी प्राटा पुरेसा विस्तीर्ण अन् पातळ झाल्यावर त्याच्या कडा आत दुमडल्या जातात. अंडे, कांदा, चीज किंवा केळी यांचे सारण भरायचे असल्यास, ते सारण मध्ये भरून कडा दुमडल्या जातात. बाजू पालटत रोटी प्राटा तव्यावर भाजला जातो. भाजल्यानंतर रोटी प्राटा तव्यावरून काढून दोन्ही हातांच्या "टाळीने" फोडला जातो; यामुळे प्राट्यातली वाफ बाहेर पडते व प्राट्याची पारी कुरकुरीत राहते.

बाह्य दुवे[संपादन]