रोजाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलेशियातले मामाक रोजाक

रोजाक (भासा मलायू: Rojak) किंवा रुजाक (भासा इंदोनेसिया: Rujak ;) हा इंडोनेशिया, मलेशियासिंगापुरात प्रचलित असलेला भाज्याफळे घालून केलेला सलाडसदृश खाद्यपदार्थ आहे. मलय भाषेनुसार रोजाक या शब्दाचा अर्थ मिसळ असा आहे. सहसा काकडी, अननस, मोड आलेली कडधान्ये, ताउपोक (हरवाळ, तळलेले तोफू), यूत्याओ (लांबट आकाराचे चिनी पद्धतीचे भजी) यांच्या फोडी रोजाकात मुख्य घटकपदार्थ म्हणून वापरल्या जातात. त्यावर सांबाल ब्लाचान (कोळंबीची तिखट चटणी), साखर, मिरची, लिंबाचा रस व पाणी यांपासून बनवलेले ड्रेसिंग घालून त्यात या फोडी कालवून रोजाक बनवले जातात. वाढपाआधी रोजाकावर सढळ प्रमाणात शेंगदाण्याचा कूट घातला जातो.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "रोजाकाची पाककृती" (इंग्लिश भाषेत). ८ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)