रॉबर्ट डी नीरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट डी नीरो

रॉबर्ट अँथनी डी नीरो (/dəˈnɪr//dəˈnɪr/; १७ ऑगस्ट, १९४३ - ) हे अमेरिकी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. ते इटली आणि अमेरिका दोन्ही देशांचे नागरिक आहेत. १९७४ च्या द गॉडफादर भाग २ चित्रपटातील लहान व्हिटो कोर्लियोनच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम सहाय अभिनेत्यासाठीचा ॲकॅडेमी पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसेसोबत त्यांच्या सहयोगातून १९८० च्या रेजिंग बुल चित्रपटातील जॅकला मोटाच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा ॲकॅडमी पुरस्कार मिळाला. २००३ मध्ये त्यांनी एएफआय जीवनगौरव पुरस्कार, २०१० मध्ये गोल्डन ग्लोब सेसील बी. डिमेली पुरस्कार आणि  २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाकडून त्यांनी प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम स्वीकारले