Jump to content

रॉबर्ट कियोसाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट कियोसाकी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावRobert Toru Kiyosaki संपादन
दिलेले नावRobert, とおる संपादन
लघुनामRobert Kiyosaki संपादन
जन्म तारीख८ एप्रिल 1947 संपादन
जन्मस्थानहीलो संपादन
वैवाहिक जोडीदारKim Kiyosaki संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाजपानी भाषा, इंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of Hawaiʻi at Hilo, United States Merchant Marine Academy, Hilo High School संपादन
युद्धव्हियेतनाम युद्ध संपादन
सेना शाखाUnited States Marine Corps संपादन
उल्लेखनीय कार्यRich Dad Poor Dad, Augmentez votre intelligence financière संपादन
पुरस्कारAir Medal संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.richdad.com संपादन

रॉबर्ट तोरू कियोसाकी (जन्म: ८ एप्रिल, १९४७) हे एक अमेरिकन व्यावसायिक, उद्योजक आणि लेखक आहेत. रिच डॅड पुअर डॅड हे त्यांनी लिहिलेले जगातील सर्वात लोकप्रिय आर्थिक साक्षरतेवरील पुस्तक आहे. याच सोबत त्यांनी 'रिच डॅड कंपनी'ची स्थापना केली. ज्याद्वारे ते पुस्तके आणि व्हिडिओंच्या माध्यमातून लोकांना वित्त व्यवस्थापन आणि व्यवसायाचे शिक्षण देतात. यासोबतच त्यांनी 'रिच ग्लोबल एलएलसी' ही कंपनीही सुरू केली होती, परंतु २०१२ मध्ये या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.[] नंतर कियोसाकी यांच्या सेमिनारला उपस्थित राहिलेल्या लोकांनी त्यांच्यावर सामूहिक दावा दाखल केला होता.[][]

कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन,[] डब्लूटीएइ टीव्ही[] आणि सीबीएस न्युज[] यांसारख्या प्रसिद्ध वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या व्यावसायिक पद्धतींवर शोधपत्रकारीतेवर आधारित माहितीपट प्रसारित केले आहेत.

बालपण आणि शिक्षण

[संपादन]

कियोसाकी यांचा जन्म १९४७ मध्ये हिलो, हवाई येथे वडील राल्फ आणि आई माजोरी कियोसाकी या जपानी जोडप्याच्या पोटी झाला.[] [] त्यांच्या आई या एक परिचारिका होत्या. कियोसाकी हे या कुटुंबातील सर्वात मोठे अपत्य आहेत. त्यांची एक बहिण तेन्झिन काचो, या दलाई लामा यांच्याकडून नियुक्त झालेल्या बौद्ध भिक्षुणी होत्या. त्यांनी कॅलिफोर्नियातील लाँग बीच येथील एका बौद्ध केंद्रात काम केले.[] त्यांची दुसरी बहीण ग्राफिक डिझायनर आहे, तर त्यांचा भाऊ मालमत्ता व्यवस्थापनात काम करतो.[]

कियोसाकी यांचे वडील एक शिक्षक होते. त्यांनी काही काळ हवाईचे शाळा अधीक्षक म्हणून काम केले होते. याशिवाय त्यांनी १९७० च्या हवाई मधील सार्वजनिक निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीच्या तिकीटावर लेफ्टनंट-गव्हर्नर पदासाठी एक निवडणूक देखील लढवली होती.[१०][११] यात ते पराभूत तर झालेच आणि या निवडणुकीनंतर त्यांची नोकरी देखील गेली. या नंतर त्यांनी आईस्क्रीमची एक फ्रँचायझी सुरू केली आणि यात देखील ते अपयशी ठरले. पुढे त्यांनी कामगार संघटनांसाठी काम केले.[]

हिलो येथे जाण्यापूर्वी कियोसाकी यांनी मानोआ एलिमेंटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले.[१२] नंतर त्यांनी हिलो मधून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.[१३] कमी गुण मिळाल्याने त्यांना येथून काढून टाकण्यात येणार होते.[११] १९६५ मध्ये, त्यांनी युनायटेड स्टेट्स मर्चंट मरीन अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि चार वर्षांनंतर डेक ऑफिसर म्हणून पदवी मिळवली.[] मॅटसन इन्क च्या जहाजांवर मिडशिपमन म्हणून प्रवास केल्यानंतर,[१२] ते युनायटेड स्टेट्स मरीन कोअर मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. कियोसाकी यांनी व्हिएतनाम युद्धादरम्यान हेलिकॉप्टर गनशिप पायलट म्हणून सेवा बजावली. यादरम्यान एकदा ते कानोहे बे येथे तैनात होते.[१४][१२]

कारकीर्द

[संपादन]

सुरुवातीचे उद्योग

[संपादन]

१९७७ मध्ये, कियोसाकी यांनी "रिपर्स" नावाची एक कंपनी सुरू केली. ही कंपनी नायलॉन आणि वेल्क्रो पाकिटांची विक्री करत असे.[१४] लवकरच ही कंपनी दिवाळखोरीत निघाली. इथून ते जून १९७८ पर्यंत कियोसाकी हे झेरॉक्स कंपनीत सेल्स असोसिएट म्हणून कार्यरत होते.[१४] १९८० च्या दशकात, कियोसाकी सॅन डिएगोमध्ये एक प्रेरणादायी वक्ता म्हणून कार्यशाळा घेत असे. ज्यात त्यांनी 'मनी अँड यू' नावाचा 'एरहार्ड सेमिनार ट्रेनिंग' तंत्रावर आधारित कोर्स चालवला होता. १९७४ मध्ये या कोर्सचे निर्माते मार्शल थर्बर यांच्याकडून त्यांनी हा कोर्स शिकला होता. १९८४ मध्ये, थर्बर यांनी हा व्यवसाय कियोसाकी आणि डी.सी. कोर्डोव्हा यांच्याकडे सोपवला. या जोडीने पुढे या कोर्सचा अमेरिकेबाहेर विस्तार केला.[११] एका विशिष्ट टप्प्यावर या कोर्सचे आंतरराष्ट्रीय स्तरावर हजारो विद्यार्थी निर्माण झाले होते.[१४] ऑक्टोबर १९९३ मध्ये ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या फोर कॉर्नर्स या कार्यक्रमाने हा कोर्स भावनिक शोषणावर आधारित असल्याचा माहितीपट प्रसारित केला. यामुळे ऑस्ट्रेलियात हा व्यवसाय कोलमडण्याच्या स्थितीत आला होता. कियोसाकी यांनी हा माहितीपट "अन्यायकारक" असल्याचे घोषित करून एबीसी विरुद्ध खटला भरण्याचा निर्णय घेतला. परंतु काही कारणाने त्यांनी हा निर्णय रद्द केला. पुढे १९९४ मध्ये त्यांनी हा व्यवसाय सोडला.[११]

आर्थिक साक्षरतेचा प्रसार

[संपादन]

१९९३ मध्ये कियोसाकी यांनी 'इफ यू वॉन्ट टू बी रिच अँड हॅपी, डोन्ट गो टू स्कूल?' हे आपले पहिले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी पालकांना असा सल्ला दिला की, त्यांनी आपल्या मुलांना पारंपारिक कॉलेज शिक्षणाऐवजी रिअल इस्टेटच्या व्यवसायात उतरवण्यासाठी प्रोत्साहित करावे.[१५] त्यांनी 'कॅशफ्लो टेक्नॉलॉजीज' नावाच्या एका होल्डिंग कंपनीची स्थापना केली, ज्याच्या अंतर्गत २००२ पर्यंत 'रिच डॅड पुअर डॅड' आणि 'कॅशफ्लो' हे दोन्ही ब्रँड्स येत होते. त्या सुमारास कियोसाकी स्वतःला या कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून टप्प्याटप्प्याने बाजूला करून घेण्याच्या तयारीत होते.[१४][१६][१७]

आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी केवळ पुस्तकेच लिहिली नाहीत, तर प्रौढ व्यक्ती आणि तरुणांसाठी 'कॅशफ्लो' नावाचे बोर्ड गेम्स आणि व्हिडिओ गेम्स देखील विकसित केले, जेणेकरून लोकांना खेळता-खेळता गुंतवणुकीच्या संकल्पना समजतील.[]

कियोसाकी यांच्या आयुष्यात काही मोठे कायदेशीर वादही निर्माण झाले. २००८ मध्ये त्यांची व्यावसायिक भागीदार शेरॉन लेक्टर यांनी त्यांच्यावर एक खटला दाखल केला होता. लेक्टर यांचा आरोप होता की, कियोसाकी दाम्पत्याने व्यवसायातील मालमत्ता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली, मात्र कियोसाकी यांनी हे आरोप फेटाळून लावले. अखेर, एका ठराविक रकमेवर तडजोड करून हा खटला निकाली काढण्यात आला. या तडजोडीनंतर लेक्टर यांनी रिच डॅड कंपनीतील आपला हिस्सा विकला आणि त्यांची सुमारे १० वर्षांची भागीदारी संपुष्टात आली.[१८]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

कियोसाकी यांचा त्यांच्या पहिल्या पत्नीपासून वयाच्या ३२ व्या वर्षी घटस्फोट झाला.[१९] १९८४ मध्ये कियोसाकी आणि किम्बर्ली "किम" यांची भेट झाली. १९८६ मध्ये या जोडप्याने लग्न केले. किम त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि व्यावसायिक भागीदार बनल्या.[१९][११] कालांतराने २०१७ मध्ये या जोडप्याचा आपसी सहमतीने घटस्फोट झाला.[२०]

कियोसाकी यांना एकदा त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी आपल्यावर १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज असल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे त्यांच्या मते, ही त्यांची कोणतीही समस्या नसून केवळ एक सर्वसामान्य बाब होती.[२१]

प्रमुख पुस्तके

[संपादन]

रॉबर्ट कियोसाकी यांनी आर्थिक साक्षरता आणि व्यवसायावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे मुख्य विषय म्हणजे पैसा, गुंतवणूक आणि आर्थिक स्वातंत्र्य.

वर्ष पुस्तकाचे नाव विषय
१९९७ रिच डॅड पुअर डॅड श्रीमंत लोक आपल्या मुलांना पैशाबद्दल काय शिकवतात, जे गरीब आणि मध्यमवर्गीय शिकवत नाहीत.
२००० कॅशफ्लो क्वाड्रंट आर्थिक स्वातंत्र्यासाठी 'कॅशफ्लो क्वाड्रंट'चे महत्त्व (E, S, B, I मॉडेल)
२००० रिच डॅड्स गाईड टू इन्वेस्टिंग श्रीमंत लोक नेमकी कुठे गुंतवणूक करतात?
२००१ द बिझनेस स्कूल 'मल्टी-लेव्हल मार्केटिंग' (MLM) आणि नेटवर्किंग व्यवसायावर आधारित.
२००१ रिच किड, स्मार्ट किड मुलांना आर्थिक बाबींमध्ये आघाडीवर कसे ठेवावे?
२००२ रिटायर यंग, रिटायर रिच लवकर निवृत्त होऊन श्रीमंत कसे व्हावे?
२००२ रिच डॅड्स प्रॉफेसी शेअर बाजारातील मोठ्या कोसळण्याबद्दलची भविष्यवाणी आणि त्यातून नफा कसा मिळवायचा.
२००३ द बिझनेस स्कूल: फॉर पीपल हू लाईक हेल्पिंग पीपल आपसी सहकार्याचा व्यावसायकी फायदा
२००४ रिच डॅड, पुअर डॅड फॉर टीन्स शाळेत न शिकवलेली पैशांची गुपिते (तरुणांसाठी)
२००४ हू टूक माय मनी? पैसा कसा खर्च होतो
२००५ बिफोर यू क्विट युवर जॉब उद्योजकांसाठी नोकरी सोडण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारखे १० धडे.
२००६ व्हाय वी वाँट यू टू बी रिच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सह-लिखित पुस्तक
२००८ इन्क्रीज युवर फायनान्शिअल आयक्यू तुमचा आर्थिक बुद्ध्यांक वाढवून हुशारीने पैसे हाताळा.
२००९ कॉन्स्पिरसी ऑफ द रिच पैशाचे ८ नवीन नियम आणि श्रीमंतांचे 'षडयंत्र'
२०११ मिडास टच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत; काही उद्योजक यशस्वी का होतात यावर मार्गदर्शन
२०१३ व्हाय 'ए' स्टुडंट्स वर्क फॉर 'सी' स्टुडंट्स पालकांसाठी मुलांच्या आर्थिक शिक्षणाबाबतचे मार्गदर्शक पुस्तक
२०१५ सेकंड चान्स तुमच्या पैशासाठी, आयुष्यासाठी आणि जगासाठी 'दुसरी संधी'
२०१७ व्हाय द रिच आर गेटिंग रिचर खरी 'आर्थिक साक्षरता' म्हणजे काय?
२०१९ फेक खोटे पैसे, खोटे शिक्षक आणि खोट्या मालमत्ता यांपासून स्वतःला कसे वाचवावे?
२०२० हू स्टोलन माय पेन्शन पेन्शनमधील घोटाळे आणि लूट कशी थांबवावी?
२०२१ कॅपिटलिस्ट मॅनिफेस्टो भांडवलशाही आणि आर्थिक व्यवस्थेवर आधारित विचार

संदर्भ

[संपादन]
  1. Kim, Susanna (12 October 2012). "'Rich Dad, Poor Dad' Author Files for Bankruptcy for His Company". ABC News. 18 July 2018 रोजी पाहिले.
  2. Olen, Helaine (11 February 2016). "This Legal Dispute Says Everything About the Shadiness of Personal Finance Gurus". Slate. 18 July 2018 रोजी पाहिले.
  3. "Marketwatch – Rich dad's seminar's deceptive marketplace". Canadian Broadcasting Company. February 24, 2010. रोजी मूळ पानापासून संग्रहित2025-09-03. 13 November 2017 रोजी पाहिले YouTube द्वारे.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  4. 1 2 Johnson, Erica (reporting) (January 29, 2010). Season 37: 3. Road to Rich Dad. Marketplace. Canadian Broadcasting Company. 23 November 2020 रोजी पाहिले.
  5. Van Osdol, Paul (9 May 2013). "'Rich Dad' Author's Seminars Cost Thousands, But Not Everyone Gets Rich". WTAE-TV. 18 July 2018 रोजी पाहिले.
  6. Roth, Allan (4 March 2010). "Rich Dad Education—The Ultimate Emotional Investment". CBS News. 26 November 2018 रोजी पाहिले.
  7. Yoshikawa, Mai (January 18, 2018). "'Rich Dad Poor Dad' Author Robert Kiyosaki Appeals for Financial Literacy". The Japan Times. Kyodo.
  8. 1 2 3 4 Tan, Sumiko (January 12, 2020). "Lunch With Sumiko: I Was a Late Bloomer, Says Rich Dad Poor Dad Author Robert Kiyosaki". The Straits Times.
  9. Sahagun, Louis (February 9, 2009). "Blending Her Spirituality and His Materialism". Los Angeles Times.
  10. Zia, Hoyt (April 2006). "Rich Son, Poor Son". Hawaii Business. Hawaii The Free Library द्वारे.
  11. 1 2 3 4 5 Carbonara, Peter; Caplin, Joan (January 1, 2003). "Poor Man's Prophet Robert Kiyosaki, Author of Rich Dad, Poor Dad Says That Everything You've Been Told About Money is a Lie. Is His Vision Setting Us on the Right Track—Or Is It Just More Financial Snake Oil?". Money. 2007-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2025 रोजी पाहिले CNN.com द्वारे.
  12. 1 2 3 Magin, Janis (October 2, 2019). "'Rich Dad' Author Returning to Hawaii to Speak, But Not Invest". Pacific Business News.
  13. Caraccio, David (July 25, 2022). "Investor, Author of 'Rich Dad, Poor Dad' Lists Hawaii Home on Edge of Ocean for $7.35M". The Sacramento Bee.
  14. 1 2 3 4 5 Youn, Jacy L. (June 2002). "Robert Kiyosaki". Hawaii Business. September 23, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 22, 2016 रोजी पाहिले. Currently preparing to phase himself out of Cashflow Technologies (the holding company for the Rich Dad brand), while still collecting royalties on its product line–and at the same time attempting to take another company public–Kiyosaki has made a sport of building and selling companies worldwide.
  15. Kiyosaki, Robert (1 April 1993). If You Want to Be Rich & Happy Don't Go to School: Ensuring Lifetime Security for Yourself and Your Children (2 ed.). Aslan publications. ISBN 978-0-944031-38-4.
  16. "Entity Details—Secretary of State, Nevada". Nevada Secretary of State. 2014-07-10 रोजी पाहिले.साचा:Primary source inline
  17. "Trademark Electronic Search System: RICH DAD". USPTO Trademark Electronic Search System. July 25, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-07-10 रोजी पाहिले.साचा:Primary source inline
  18. Harris, Craig (2008-09-04). "'Rich Dad' Partners Settle Suit, Call It Quits". The Arizona Republic. 2008-09-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  19. 1 2 Kiyosaki, Robert T. (1992). If You Want to Be Rich and Happy Don't Go to School. Excellerated Learning Publishing. ISBN 9780646079370.
  20. Byrne, Brendan (2024-06-10). "Robert Kiyosaki Net Worth: A Comprehensive Overview of The Rich Dad, Poor Dad Author's Wealth". ValueWalk (इंग्रजी भाषेत). 2024-06-20 रोजी पाहिले.
  21. Royle, Orianna Rosa (2024-01-04). "'Rich Dad, Poor Dad' Author Reveals He's $1 billion in Debt—But Says Going Bust Would 'Not Be His Problem'". Fortune.com (इंग्रजी भाषेत). 2024-06-20 रोजी पाहिले.