रॉबर्ट एडवर्ड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर रॉबर्ट एडवर्डस्‌ (२७ सप्टेंबर, इ.स. १९२५ - १० एप्रिल, इ.स. २०१३) हे नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शरीरक्रियाशास्त्र होते. त्यांना "आयव्हीएफ' (IVF) तंत्राचा उपयोग करून टेस्टट्यूब बेबी जन्माला घालण्याच्या संकल्पनेचे प्रणेते समजले जाते. त्यांच्या व त्यांचे सहकारी पॅट्रिक स्टेप्टो यांच्या प्रयत्नांना १९७८ मध्ये यश येऊन जगातील पहिली टेस्टट्यूब बेबी ठरलेल्या लुईस ब्राऊनचा जन्म झाला होता.