Jump to content

रेवण्णा उमादेवी नागराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रेवन्ना उमादेवी नागराज या पानावरून पुनर्निर्देशित)
R Umadevi Nagaraj (es); রেবন্না উমাদেবী নাগরাজ (bn); R Umadevi Nagaraj (fr); آر اومادیوی ناگراج (ur); R Umadevi Nagaraj (sl); R Umadevi Nagaraj (ast); R Umadevi Nagaraj (ca); रेवण्णा उमादेवी नागराज (mr); ఆర్ ఉమాదేవి నాగరాజ్ (te); ਉਮਾਦੇਵੀ ਨਾਗਰਾਜ (pa); ৰেভানা উমাদেৱী নাগাৰাজ (as); R Umadevi Nagaraj (ga); R Umadevi Nagaraj (en); உமாதேவி நாகராஜ் (ta) Indian cueist; (en); రేవణ్ణ ఉమాదేవి నాగరాజ్ (జననం: 11 ఫిబ్రవరి 1965) ఇంగ్లీష్ బిలియర్డ్స్, స్నూకర్ యొక్క భారతీయ ప్రొఫెషనల్ క్రీడాకారిణి. (te); ਭਾਰਤੀ ਕਿਊਈਸਟ (pa); Indian cueist; (en); لاعبة سنوكر هندية (ar); xugadora de snooker india (ast); கோல்மேசை ஆட்ட வீரர் (ta) Revanna Umadevi, Revanna Umadevi Nagaraj (en); இரேவண்ணா உமாதேவி நாகராஜ் (ta); ਰੇਵੰਨਾ ਉਮਾਦੇਵੀ (pa)
रेवण्णा उमादेवी नागराज 
Indian cueist;
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखफेब्रुवारी ११, इ.स. १९६५
भारत
नागरिकत्व
कोणत्या देशामार्फत खेळला
व्यवसाय
  • स्नूकर खेळाडू
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रेवण्णा उमादेवी नागराज (जन्म: ११ फेब्रुवारी, १९६५), ही इंग्रजी बिलियर्ड्स आणि स्नूकरची एक राष्ट्रीय स्तरावरील भारतीय खेळाडू आहे.[] ती जागतिक महिला बिलियर्ड ची २०१२ सालची विजेता [] तसेच सहा वेळा भारतीय राष्ट्रीय बिलियर्ड्स विजेता आहे. [] लंडन येथे २०१२ साली झालेल्या बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या इवा पाल्मियसला हरवून उमादेवी विश्वविजेता बनली होती.[]

जीवन

[संपादन]

उमादेवीचा जन्म १९६५ मध्ये कर्नाटक राज्यात झाला. बंगळूर येथे टायपिस्ट म्हणून काम करत असताना, ती 'कर्नाटक सरकारी सचिवालय क्लब' येथे टेबल टेनिस खेळण्यासाठी जात असे. एक दिवस, उमदेवी टेबल टेनिस खेळण्यासाठी क्लब मध्ये गेली होती. परंतु टेनिस खेळण्यासाठी तिचा नंबर यायला अजून वेळ होता. बराच वेळ वाट पाहत असताना कंटाळून जाऊन तिने आपला मोर्चा बिलियर्ड्स खेळाकडे वळवला. कालांतराने टेनिस ऐवजी तिचा बिलियर्ड्स मध्ये रस निर्माण झाला. पुढे ती या खेळात प्रवीण बनली आणि त्यानंतर तिने परत कधी मागे वळून पाहिले नाही. या खेळात तिला अरविंद सावूर, एस. जयराज आणि एम.जी. जयराम सारख्या प्रसिद्ध बिलियर्ड्स खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन लाभले.

२०१२ मध्ये, उमादेवीने जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियन तसेच ८ बॉल पूल राष्ट्रीय चॅम्पियनचा किताब जिंकला. उमादेवी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिलियर्ड्स स्पर्धांमध्ये अव्वल स्थान मिळविण्यासाठी नियमित सराव करत असते. यातील अनुभवामुळे तिने निवृत्तीनंतर संबंधित क्रीडा क्षेत्रात क्रीडा प्रशिक्षक बनून उदयोन्मुख क्रीडापटूंना उत्तम बिलियर्ड्स पटू बनवण्याचा ठाम निर्णय घेतला.

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • २००९ मध्ये कर्नाटक सरकारने बिलियर्ड्समधील योगदानाबद्दल तिला एकलव्य पुरस्काराने सन्मानित केले.
  • २०१२ मध्ये ती जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियन आणि ८ बॉल पूल राष्ट्रीय चॅम्पियन बनली.
  • २०१७ च्या नारी शक्ती पुरस्कारासाठी भारतातील एकूण ३० विजेता महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला. ८ मार्च २०१८ साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिला नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[]
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "R. Umadevi". www.cuesportsindia.com. 27 June 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-05-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Indians shine in 2012 as Advani, Aditya hog limelight - Times of India". The Times of India. 14 November 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-05-03 रोजी पाहिले.
  3. ^ Achal, Ashwin (23 January 2018). "Umadevi triumphs". The Hindu. India. 20 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 December 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "I'm really delighted, says Umadevi". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2012-04-27. 19 November 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-05-03 रोजी पाहिले.
  5. ^ "How Umadevi Transformed Herself From A Shy Typist To A Billiards World Champion". The Better India (इंग्रजी भाषेत). 2014-06-03. 13 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-05-03 रोजी पाहिले.