रेगन्सबुर्ग
रेगन्सबुर्ग Regensburg (जर्मन) |
||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
देश | ![]() |
|
राज्य | बायर्न | |
क्षेत्रफळ | ८०.७६ चौ. किमी (३१.१८ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९९१ फूट (३०२ मी) | |
लोकसंख्या (३१ डिसेंबर २०१३) | ||
- शहर | १,४०,२७६ | |
- घनता | १,७०० /चौ. किमी (४,४०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
www.regensburg.com |
रेगन्सबुर्ग (जर्मन: Regensburg) हे जर्मनीच्या बायर्न राज्यामधील एक शहर आहे. रेगन्सबुर्ग जर्मनीच्या आग्नेय भागात व बायर्नच्या पूर्व भागात डॅन्यूब नदीच्या काठावर वसले आहे. सुमारे १.४ लाख लोकसंख्या असलेले रेगन्सबुर्ग म्युनिक, न्युर्नबर्ग व आउग्सबुर्ग खालोखाल बायर्न राज्यातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
११३५ ते ११४६ दरम्यान रेगन्सबुर्गमध्ये डॅन्यूब नदीवर एक दगडी पूल बांधण्यात आला ज्यामुळे उत्तर युरोप व व्हेनिसदरम्यान व्यापाराला चालना मिळाली व रेगन्सबुर्गचे महत्त्व वाढले. मध्य युगातील पवित्र रोमन साम्राज्यकाळात रेगन्सबुर्ग हे एक स्वायत्त शहर होते. १५४२ साली रेगन्सबुर्गने प्रोटेस्टंट सुधारणांचा अंगिकार केला. इ.स. १८०३ साली रेगन्सबुर्गची स्वायत्तता संपुष्टात आली व १८१० साली ते बायर्नच्या राजतंत्रामध्ये सामावून घेण्यात आले.
२००६ साली रेगन्सबुर्गला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये स्थान देण्यात आले.
संदर्भ[संपादन]
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2017-05-06 at the Wayback Machine.
विकिव्हॉयेज वरील रेगन्सबुर्ग पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |