रेखाकला परिक्षा (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्य कलासंचालनाद्वारे एलीमेंटरीइंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परिक्षा अर्थात रेखाकला परिक्षा घेतल्या जातात. या दोन्ही परिक्षांमध्ये प्रत्येकी चार प्रश्नप्रत्र असतात. एलीमेंटरी परीक्षा: १. वस्तुचित्र २. स्मरणचित्र ३. संकल्पचित्र व ४. कर्तव्यभुमिती व अक्षर लेखन. इंटरमिजिएट परीक्षा: १. स्थिरचित्र २. स्मरणचित्र ३. संकल्पचित्र व ४. कर्तव्यभुमिती, घनभूमिती व अक्षर लेखन. महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर या परीक्षा सुमारे ५०० पेक्षा अधिक केंद्रांवरून घेतल्या जातात. या परीक्षांसाठी नोंदणी संबंधीत केंद्रांवर साधारणत: जुलै/ऑगस्ट महिन्यांमध्ये केल्या जाते व परीक्षा सप्टेंबरच्या अंतिम आठवड्यात घेतल्या जातात.