Jump to content

रेकॉर्ड ऑफ योग (द्विखंडात्मक ग्रंथ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

 रेकॉर्ड ऑफ योग ही भारतीय तत्वज्ञानी आणि योगी श्रीअरविंद यांची वैयक्तिक रोजनिशी आहे. त्यामध्ये १९०९ ते १९२७ या कालावधीतील त्यांच्या योगसाधनेची नोंद आहे. यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने साधना केली त्या सप्तचतुष्टय प्रणालीची नोंद आहे. चार घटकांचा एक गट या प्रमाणे एकंदर सात गटांमध्ये त्यांच्या साधनाप्रणालीचे वर्गीकरण करण्यात आले होते. त्यांच्या दैनंदिन अनुभवांचे रेकॉर्ड ऑफ योग या द्विखंडात्मक ग्रंथांमध्ये दस्तऐवजीकरण केले गेले आहे. यात संस्कृत शब्द, संक्षेप आणि चिन्हे यांचा समावेश असलेल्या विशेष शब्दावलीचा वापर केला आहे, त्यामध्ये योगविषयक पारिभाषिक संज्ञा विपुल प्रमाणात येतात, त्यामुळे तो एक अत्यंत तांत्रिक मजकूर बनतो. कदाचित त्यामुळे हा ग्रंथ दुर्बोध ठरतो.

या ग्रंथाच्या प्रकाशनासंबंधी

[संपादन]

१९७७ मध्ये, प्रकल्पाच्या संपादकांनी श्रीअरविंद यांच्या समग्र साहित्याची सुधारित आणि दुरुस्त केलेली आवृत्ती प्रकाशित केली. आणि त्याच वेळी श्रीअरबिंदो: अर्काईव्ज ॲँड रिसर्च नावाचे नियतकालिक सुरू केले. श्रीअरविंद यांच्या नव्याने शोध लागलेल्या लेखनाचा समावेश या नियतकालिकामध्ये पुढील १८ वर्षांत करण्यात आला. २००१ मध्ये रेकॉर्ड ऑफ योग हा ग्रंथ दोन खंडांमध्ये प्रकाशित झाला.

पारिभाषिक संज्ञा आणि संक्षेपांच्या व्यापक वापरामुळे, श्रीअरविंद यांनी त्यांच्या अनुभवासाठी अनुकूलित केलेल्या विशिष्ट अर्थांचे स्पष्टीकरण देण्यासाठी एक शब्दकोश यामध्ये समाविष्ट केला आहे. त्याचा उपयोग "योग ऑफ सेल्फ-परफेक्शन" समजावून घेण्यासाठी होतो. योग ऑफ सेल्फ-परफेक्शन हा द सिंथेसिस ऑफ योग या ग्रंथातील चौथा भाग आहे.


संदर्भ

[संपादन]
  • श्रीअरविंद, रेकॉर्ड ऑफ योग, खंड १, ७७७ पृष्ठे, ISBN 81-7058-651-8(हार्ड कव्हर);
  • खंड दुसरा, ७२८ पृष्ठे, ISBN 81-7058-653-4(हार्ड कव्हर), श्रीअरबिंदो आश्रम प्रेस, पाँडिचेरी


बाह्य दुवे

[संपादन]