रुबिकोन नदी
Appearance
रुबिकोन नदी इटलीमधील नदी आहे. देशाच्या ईशान्य भागातील ही नदी ॲपेनाइन पर्वतात उगम पावून पूर्वेकडे वाहते व एड्रियाटिक समुद्रास मिळते. याच्या काठी असलेल्या लाल मातीमुळे ही नदी अनेकदा लाल दिसते. त्यामुळे हिचे नाव (लॅटिन शब्दावरून) रुबिकोन असे ठेवले गेले.
इ.स.पू. ४९मध्ये जुलियस सीझरने ही नदी ओलांडून उत्तरेकडील सैन्यास दक्षिण इटलीत असलेला मज्जाव धुडकावून लावला व इटलीतील नागरी युद्धास तोंड फोडले होते.