रुपाली रेपाले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुपाली रामदास रेपाले या पानावरून पुनर्निर्देशित)
रुपाली रेपाले
जन्म रुपाली रेपाले
फेब्रुवारी 3 1982
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
ख्याती लांब पल्ल्याची जलतरणपटू
जोडीदार विशाल हिंगे
अपत्ये स्वराज हिंगे (मुलगा), हिंदवी हिंगे (मुलगी)
संकेतस्थळ
http://www.rupaliaqua.com

रुपाली रामदास रेपाले (जन्म February फेब्रुवारी 3 1982 मुंबई), ही [भारतीय] खुल्या पाण्याची लांब पल्ल्याची जलतरणपटू आणि ट्रायथिलेट आहे. १५ ऑगस्ट १९९४ रोजी तिने १६ तास ७ मिनिटांत इंग्लिश चॅनेल पोहून पार केला. [१] [२] आणि ती त्या वर्षातील सर्वात तरुण यशस्वी जलतरणपटू (१२ वर्ष) बनली. [३] तिच्या जलतरण कारकिर्दीत जिब्राल्टर स्ट्रेट, पल्क स्ट्रेट, बास स्ट्रेट, कुक स्ट्रेट, [४] रॉबेन आयलॅंड चॅनेल आणि मुंबई-धरमतर चॅनेल असे एकूण सात पल्ले तिने पोहून पूर्ण केले आहेत. [५] [६]

रुपाली रीपाले यांचा जन्म मुंबईत झाला, ती रामदास आणि रेखा रेपाळे यांची मुलगी. ग्रामीण भागातील पुण्यात जन्मलेले दोन्ही पालक सत्तरच्या दशकात लग्नाच्या आधी मुंबईत भांडुप येथे स्थायिक झाले. रुपालीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदवी मिळविली. [७] रुपालीने अगदी लहान वयातच पोहण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्यात प्राविण्य मिळवले. अगदी लहान वयातच तिने उल्लेखनीय प्रगती केली. तासन् तास् पोहणाऱ्या रुपालीची तयारी तिच्या प्रशिक्षकांच्या लक्षात आली. आणि नंतर तिच्या वडिलांच्या पाठिंब्याने तिने लवकरच लांब पल्ल्याच्या आणि नंतर मोकळ्या समुद्री पाण्यात प्रशिक्षण घेणे सुरू केले. पोहण्याव्यतिरिक्त ती ट्रायथलॉन इव्हेंटमध्येही भाग घेते आणि त्यामध्ये बरेच प्राविण्य मिळवले आहे. [८]

रुपाली या जलशुद्धीकरण उपकरण बनविणाऱ्या "रुपाली इंडस्ट्रीज"च्या संस्थापक आणि संचालक आहेत, [१६] वेळ मिळेल तेव्हा स्थानिक जलतरण तलावात प्रशिक्षण देणे त्यांना आवडते.  

  • सुमेध वडावाला लिखित आणि राजहंस प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले जल अक्रमिले ( मराठी ) चरित्र पुस्तक. [१७]
  • तरुणांना खेळात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी रुपालीच्या पुस्तकातील उताराचा महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रमात समावेश आहे. [१८]
  1. ^ http://www.channelswimmingassociation.com/swim/2942/rupali-ramdas-repale/
  2. ^ https://www.dover.uk.com/channel-swimming/swims/1994-08-15/rupali-ramdas-repale
  3. ^ http://www.channelswimmingassociation.com/awards/?award=43&year=1994
  4. ^ https://web.archive.org/web/20151208125301/http://www.cookstraitswim.org.nz/history-and-facts.php. Archived from the original on 8 December 2015. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://www.thehindu.com/2000/03/25/stories/0725100c.htm
  6. ^ http://www.outlookindia.com/magazine/story/water-nymph/205437
  7. ^ http://www.telegraphindia.com/1050504/asp/careergraph/story_4694804.asp
  8. ^ http://timesofindia.indiatimes.com/city/pune/I-win-them-all/articleshow/332795370.cms
  9. ^ http://www.channelswimmingassociation.com/awards/?award=43&year=1994
  10. ^ https://web.archive.org/web/20131015073652/http://www.acneg.com/acneg%20ingles/One%20way.html. Archived from the original on 15 October 2013. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ Darpan, Pratiyogita. https://books.google.com/?id=iegDAAAAMBAJ&lpg=PA449&dq=rupali%20repale%20dharamtar&pg=PA449#v=onepage&q=rupali%20repale%20dharamtar&f=false. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ http://www.stuff.co.nz/sport/364994/Cook-Strait-swimming-record-smashed
  13. ^ http://www.capeswim.com/#records
  14. ^ http://pib.nic.in/archieve/phtgalry/pg0699/pg9ju99/0906994.html
  15. ^ http://mcomments.outlookindia.com/story.aspx?sid=4&aid=205437[permanent dead link]
  16. ^ http://www.rupaliaqua.com/
  17. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-10-10. 2019-10-10 रोजी पाहिले.
  18. ^ "संग्रहित प्रत" (PDF). Archived from the original (PDF) on 2016-04-07. 2019-10-10 रोजी पाहिले.