रीमा सेन
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| दिलेले नाव | Reema |
| आडनाव | Sen |
| जन्म तारीख | २९ ऑक्टोबर 1981 |
| जन्मस्थान | कोलकाता |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | हिंदी भाषा, बंगाली भाषा |
| व्यवसाय | अभिनेता, मॉडेल, चित्रपट अभिनेता, fashion model |
| शिक्षण घेतलेली संस्था | St. Thomas' School |
| निवासस्थान | मुंबई |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 2000 |
रीमा सेन (जन्म: २९ ऑक्टोबर १९८१) ही एक माजी भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे.
जीवन आणि कारकीर्द
[संपादन]रीमा सेन यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९८१ रोजी कोलकाता येथे झाला.[१] तिने कोलकात्यातील किडरपोर येथील सेंट थॉमस गर्ल्स स्कूलमधून हायस्कूल पूर्ण केले, त्यानंतर तिचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले.
सेन यांनी २०१२ मध्ये उद्योगपती शिवकरण सिंह यांच्याशी लग्न केले. तिने २२ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांचा मुलगा रुद्रवीर याला जन्म दिला. [२]
मुंबईत, तिने तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात केली व अनेक जाहिरात मोहिमांमध्ये ती दिसली. त्यानंतर ती चित्रपटांमध्ये आली आणि तेलुगू चित्रपट चित्रम द्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, ज्यामध्ये तिने उदय किरण यांच्यासोबत काम केले, ज्यांच्यासोबत तिने नंतर मानसंथा नुव्वे मध्ये पण काम केले. ती आर. माधवन सोबत मिन्नाले या तमिळ चित्रपटातही दिसली, जो खूप यशस्वी झाला.[३] या चित्रपटासाठी तिला फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री (तमिळ) पुरस्कारही मिळाला. २००३ च्या धूल या तमिळ चित्रपटासाठी तिला फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (तमिळ) पुरस्काराचे नामांकन मिळाले होते ज्यात विक्रम आणि ज्योतिका हे तिचे सहकलाकार होते.[४] रवी तेजा व आरती अगरवाल यांच्या सोबत हाच चित्रपट तेलुगूमध्ये विडे म्हणून निर्माण झाला होता ज्यात सेनने परत आपली भूमीका बजावली.[५][६] २००४ मध्ये आलेल्या चेल्लामे या तमिळ चित्रपटासाठी तिला फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (तमिळ) पुरस्काराचे नामांकन मिळाले. ह्यात विशाल व गिरीश कर्नाड हे तिचे सह-अभिनेते होते.[७]
तिचा पहिला हिंदी चित्रपट हम हो गये आपके हा फ्लॉप झाला आणि तिने तमिळ चित्रपटात काम करत राहण्याचा निर्णय घेतला. माधवनसोबत पुन्हा एकदा रेंडू या तमिळ चित्रपटात तिचा अभिनय यशस्वी झाला. थिमिरू चित्रपटातील तिचे भाव प्रेक्षकांना खूप गोड वाटले. आयराथिल ओरुवन आणि वल्लवन मधील तिच्या नकारात्मक भूमिकेचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूप कौतुक केले.[८][९]
२०१२ मध्ये लग्न झाल्यानंतर तिने तिचे चित्रपट कारकिर्द संपवली. मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रिचा चड्डा यांच्यासोबत गँग्स ऑफ वासेपूर हा तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता.[१०]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Reema Sen to get hitched". Sify. 1 February 2012. 3 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 June 2016 रोजी पाहिले.
- ↑ "Reemma Sen, Shiv Karan Singh engaged!". The Times of India. 20 September 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Gautham Vasudev Menon – the south's Yash Chopra". Firstpost (इंग्रजी भाषेत). 20 September 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Vikram turns up trumps with Dhool" Check
|url=value (सहाय्य). रिडिफ.कॉम. 23 January 2003. 26 January 2020 रोजी पाहिले.[permanent dead link] - ↑ "Veede (2003)". Rotten Tomatoes. 26 January 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Movie review - Veede". Idlebrain.com. 26 January 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Happy Birthday Reema Sen: Five best characters played by the birthday girl". India Today. 26 January 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Aayirathil Oruvan is not for the faint hearted" Check
|url=value (सहाय्य). Rediff. 20 September 2018 रोजी पाहिले.[permanent dead link] - ↑ Aayirathil Oruvan Movie Review {3/5}: Critic Review of Aayirathil Oruvan by Times of India
|access-date=requires|url=(सहाय्य) - ↑ "Recap: What happened in 'Gangs of Wasseypur 1'". News18. 7 August 2012. 11 May 2020 रोजी पाहिले.
- Pages with URL errors
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from July 2025
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- Pages using citations with accessdate and no URL
- २१व्या शतकातील भारतीय अभिनेत्री
- कन्नड चित्रपट अभिनेत्री
- तेलुगू चित्रपट अभिनेत्री
- हिंदी चित्रपट अभिनेत्री
- कोलकाता येथील अभिनेत्री
- बंगाली चित्रपट अभिनेत्री
- तमिळ चित्रपट अभिनेत्री
- भारतीय चित्रपट अभिनेत्री
- इ.स. १९८१ मधील जन्म
- फिल्मफेर पुरस्कार विजेते