Jump to content

रीटा बहुगुणा जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रीटा बहुगुणा जोशी

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २०१९  जून २०२४
मागील श्याम चरण गुप्ता
पुढील उज्ज्वल रमण सिंह
मतदारसंघ अलाहाबाद

कार्यकाळ
मार्च २०१२  मे २०१९
मागील सुरेशचंद्र तिवारी
पुढील सुरेशचंद्र तिवारी
मतदारसंघ लखनौ छावणी

जन्म २२ जुलै, १९४९ (1949-07-22) (वय: ७७)
अलाहाबाद
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२०१६ - चालू)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९२ - २०१६)
आई कमला बहुगुणा
वडील हेमवतीनंदन बहुगुणा
नाते विजय बहुगुणा (भाऊ)

रीटा बहुगुणा जोशी ह्या एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य आहेत. त्या भारतीय जनता पक्षातर्फे २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये पर्यटनमंत्री होत्या.

त्यांचे वडील हेमवतीनंदन बहुगुणा हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते तर आई कमला बहुगुणा लोकसभा सदस्य होत्या. त्यांचे भाऊ विजय बहुगुणा हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत.