रिपब्लिकन स्टुडंट युनियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन ‍‍‍‍

Republican Student Union

संघटनेचा इतिहास[संपादन]

ऑल इंडिया पँथर सेना रोहित वेमुलाच्या क्रांतिकारी बलिदानानंतर निर्माण झाली. ऑल इंडिया पँथर सेना तसेच रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष ,युवा नेते मा. दिपक भाऊ केदार सरांच्या नेतृत्वाखाली रोहित वेमुलाचे आंदोलन राज्यभर निर्माण करून विध्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुरवात केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विध्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ऑल इंडिया पँथर सेनेनी संघर्ष केलेला आहे. पीपल्स एजुकेशन सोसायटी निधी मिळण्याची मागणी केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात आरएसएसच्या घुसखोरीला कडाडून विरोध केला. जेएनयू विध्यापिठात विध्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन केलेले आहेत. बार्टी विध्यार्थ्यांचा लढा दिलेला आहे रखडलेली फिलॉशिप मिळवून देण्यासाठी संघर्ष केलेला आहे. शिष्यवृत्तीसाठी अविरत संघर्ष करत आलो आहोत, स्वाधार योजनेचं राज्यव्यापी आंदोलन सुद्धा त्यांनी छेडलेले आहे. शोषित, पीडित, वंचित, दलित, आदिवासी, बहुजन, मुस्लिम घटकातील विध्यार्थ्यांच्या न्यायासाठी हक्कांसाठी ऑल इंडिया पँथर सेना लढत आलेली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात पाली विभाग बंद पडू दिला नाही. असे अनेक मुद्यांवर आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढत आहोत, देशात आणि राज्यात जेंव्हा जेंव्हा विध्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होईल तेंव्हा तेंव्हा आम्ही संघर्ष करत असतो.


ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन या विद्यार्थी संघटनेचे जनरल सेक्रेटरी अमोल वेटम हे विद्यार्थी चळवळीत गेले ८ वर्षापासून सातत्याने काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी रिपब्लिकन स्टुडंट फोरमच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती (आदिवासी), ओबीसी, एसबीसी, ईबीसी, एसईबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर, शिष्यवृत्ती, फ्रीशिप, स्टायपेंड, फेलोशीप, स्वाधार योजना, जात पडताळणी, दाखला, क्रिमी लेयर प्रमाणपत्र समस्या, प्रवेश संदर्भातील समस्या, कॉलेज,शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, अथवा सरकार मार्फत शोषण, वाढीव फी, हॉस्टेल प्रश्न, शैक्षणिक कर्ज प्रकरणात अडथळे, बँकेकडून त्रास, बेरोजगारी प्रश्न, खाजगीकरण, आरक्षण विरोधी सरकारचे धोरण, सरकारचे विविध अन्याय कारक आदेश / शासकीय परिपत्रके, शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी, बेरोजगारी, शिक्षकांचे प्रश्न, सामाजिक अन्याय अत्याचार विरोधात सतत मोर्चे, निर्दर्शन, आंदोलन छेडलेली आहेत.सर्वाना सोबत घेऊन राज्यव्यापी, देशव्यापी लढा उभारणे काळाची गरज असून ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन (Republican Student Union) ची स्थापना जागतिक साक्षरता दिन ०८.०९.२०२० रोजी करण्यात आली आहे.


शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर आमचे प्रेरणास्थान :[संपादन]

महाराष्ट्राचा इतिहास पाहता अन्य राज्यांच्या तुलनेत विविध चळवळींतून व्यापक समाज हितासाठी अनेक द्रष्ट्यांची फळी उभी राहिली आणि प्रबोधनासाठी समाज ढवळून काढला. वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या मार्गाने समाज मनांचं परिवर्तन केलं. अशातूनच या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि त्यांच्या कार्याने एक वेगळी ओळख दिली. या चळवळीत असंख्य विद्वान होते, प्रत्येक जातीतील द्रष्टे होते, त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, सामान्य माणसाचे हक्क, स्त्रियांचे हक्क, जन्माने उच्च-नीच ठरवणे, जाती व्यवस्था, एखाद्या वर्गालाच बहिष्कृत ठरवणे, गुलामी, शोषण, विषमता यावर प्रहार केले, तर शिक्षण, विज्ञानवाद, बुद्धिवाद, विवेकवाद अशा मुल्यांचा त्यांनी प्रचार प्रसार केला. कृतीतून समाजात विचार मंथनच नव्हे तर तसा समाज घडवण्याचा प्रयत्न केला. अशी दिव्य परंपरा या महाराष्ट्राला लाभली. त्यातूनच पुरोगामी महाराष्ट्र म्हणताच एक समीकरण दृढ़ झाले ते म्हणजे फुले-शाहू आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र.


महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे कार्य तर चौफेर आहे. विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, असे त्यांनी म्हटले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी फुले दांपत्याकडून प्रेरणा घेऊन शिक्षणासंबधीचे संस्थानात म्हत्वाचे निर्णय घेतले. १८८२ मध्ये फुल्यांनी पाहिलेले 'मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासंबधीचे' स्वप्न शाहुंनी आपल्या संस्थानात खरे करुन दाखविले. राजर्षी शाहू असे म्हणायचे, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नत्ती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या उत्तम व मुत्सदी लढवय्ये वीर शिक्षणाशिवाय कधीच निपजणार नाहीत, म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची राष्ट्राला गरज आहे असे म्हटले होते. जोतीराव फुले व राजर्षी शाहुंचे विचार घेऊनच पुढे महामानव डॉ.आंबेडकर यांनी भारतीय संविधानात शिक्षणाला म्हत्वाचे स्थान देऊन स्पर्धेच्या व विज्ञानाच्या युगात अज्ञानाला गाडून टाकण्याचे धैर्य दाखविले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी :[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येणाऱ्या पिढीसाठी घटनेमार्फत तरतुदी केल्या. इथल्या बहिष्कृत समूहांची प्रगती आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे यासाठी शिक्षण क्षेत्राला बाबासाहेबांनी महत्व दिले. शिक्षणाची सार्वत्रिक सक्ती घटनेमार्फत व्हावी अशी इच्छा बाबासाहेबांची होती. बहिष्कृत समाजातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची पूर्ण जबाबदारी शासनावरती टाकण्यात आली. उच्च शिक्षणात स्थान मिळावे म्हणून राखीव जागा आमलात आणण्यात आले. येणाऱ्या पिढीला डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस इत्यादी होण्याचा मार्ग मोकळा केला व या ७० वर्षात अनेक विद्यार्थी शिकले स्वतःच्या पायावर उभे राहिले.

बाबासाहेबांचे धोरण हाणून पाडण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना-भाजप-आरएसएस चा डाव:[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सुरक्षेततेच्या व्यवस्थेला १९९० पासून सुरुंग लावण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले , राखीव जागा, सवलती हा घटनात्मक अधिकार मागासवर्गीय समाजाचा आहे. परंतु तो डावलण्यासाठी खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे दोन शत्रू उभे केले. शोषित राखीव जागाना खो देण्यासाठीच हे पाउल उचलण्यात आले. हे खासगीकरण फक्त सरकारी उपक्रमसाठीच लागू न ठेवता आरोग्य, शिक्षण, वितीय संस्था, या क्षेत्रात ही पसरवले. त्यामुळे शोषित वंचित समाजाच्या उन्नतीला पायबंद घातला गेला. खासगीकरणाच्या धोरणाने फक्त राखीव जागा, बळी पडल्या नाहीत तर एकंदरीत महागडे शिक्षण करण्याचे धोरण अवलंबिले आहे .काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना-भाजप -आरएसएसने शिक्षण महागडे करून पुन्हा मनुवादी भांडवलशाही राजकारणाची प्रक्रिया सुरु केली आहे.

शिक्षण हे बाबासाहेबांनी मानवी हक्कांचा केंद्र बिंदू मानून वंचित शोषित समाजाला शिकायला लावून आत्मसम्मान जागृत केला.


परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना-भाजपच्या सरकारने महागडी शिक्षण व्यवस्था तयार केली, खासगीकरण करून आरक्षण, सवलती व नोकऱ्या संपवीत आहे. सध्या मेडिकल, इंजिनिअरिंग इत्यादी कोर्सेसची फी लाखाच्या घरात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना-भाजप यांच्या नादी लागून आपण काय हित साधले याचा विचार करावा. आपली लढाई आता आपणच लढली पाहिजे.

ऑल इंडिया पँथर सेना प्रणित 'रिपब्लिकन स्टुडंट युनियन' ची आवश्यकता व भूमिका :[संपादन]

ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन हे जागतिक साक्षरता दिवस दि.०८.०९.२०२० रोजी स्थापन करण्यात आली आहे. समाजामध्ये वावरणारे सर्व घटक हे समाजाच्या आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय सुधारणेला जबाबदार असतात. बहुजन, दलित, बौद्ध, मुस्लिम, अल्पसंख्याक, तळागाळातील गोरगरीब सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना शिक्षणाचे महत्व याची जाणीव करून देऊन, त्यांचे जीवन प्रकाशमान करणे हे शिक्षित, उच्चशिक्षित, तरुण-तरुणी, शिक्षक-प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर व तमाम बहुजन कर्मचारी-अधिकारी यांचे कार्य व सामाजिक बांधिलकी आहे. या सर्व कार्यात विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मानवी संस्कार घडवून माणूसकी प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य शिक्षणात असते, म्हणून शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे माणसाच्या जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. किंबहुना ते कोणीच नाकारु शकत नाही. शिक्षणामुळे माणूस बदलतो, तो समाजाचा घटक असल्याने त्याच्या बदलाचा परिणाम त्याच्याबरोबर परिवारासह समाजावर होतो. म्हणून शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मूलभूत माध्यम आहे असे मानले जाते.


जेएनयु नवी दिल्ली येथील अनेक उच्च शिक्षित युवकांनी अनेक स्तरावर आपला अनोखा ठसा उमटवला आहे. मग ती विद्यार्थी चळवळ असो, वा सरकार विरोधात लढा, यातून अनेक तरुण-तरुणी विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्षेत्रात, प्रशासकीय सेवेत, राजकारणातून देशसेवा, केंद्रीय, राज्यमंत्री पदी असे विविध प्रवास केलेला आपणास वाचनास येतो. आसाम सारख्या राज्यातून विद्यार्थ्यांनी संघर्ष करून आपल्या ताकतीच्या जोरावर व कुशल संघटन, कौशल्य दाखवत राजकारणाच्या चाव्या आपल्या हातात घेतलेल्या आहेत.


आजचे अनेक तरुण- तरुणी हे हुशार, अभ्यासू ,उच्च शिक्षित, वैचारिक असणारा, गोरगरीब जनतेच्या विविध प्रश्नांवर काम करणार आहे. समाजात अमुलाग्र बद्ल घडविण्याची ताकद केवळ विद्यार्थ्याकडे आहे. म्हणून उच्च शिक्षित तरुण-तरुणी, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी एकत्रित येऊन मनुवादी, भांडवलशाही, आरक्षण व संविधान विरोधी व्यवस्थेविरुद्ध सक्षम लढा उभारणे ही काळाची गरज आहे.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 'सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये अन्यथा अंगठेबहाद्दर अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल'. 

रिपब्लिकन स्टुडंट युनियन कशासाठी ?[संपादन]

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे . त्यांचा उच्च शिक्षित वर्गावर दृढ विश्वास होता, परंतु शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या पगारदार नोकऱ्या घेऊन घरात बसणारा तरुण बाबासाहेबांना अपेक्षित नव्हता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक महान मूलमंत्र दिला " Educate, Agitate, Organize' अर्थात 'शिका, संघर्ष करा, संघटीत व्हा' , याच मूलमंत्रावर आधारावर विद्यार्थ्यांना, उच्च शिक्षित युवक-युवतींना, प्राध्यापक, शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थी संघटना गावोगावी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मजबूत करण्यावर आम्ही भर दिलेला आहे. अशिक्षित व तळागाळातील समाजाला शिक्षित करण्याचे मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.'रिपब्लिकन स्टुडंट युनियन' ची ध्येय धोरणे :[संपादन]

१) अनुसूचित जाती, जमाती (आदिवासी), ओबीसी, एसबीसी, ईबीसी, एसईबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्याक, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर, शिष्यवृत्ती, फ्रीशिप, स्टायपेंड, फेलोशीप, स्वाधार योजना, जात पडताळणी, दाखला, क्रिमी लेयर प्रमाणपत्र समस्या, प्रवेश संदर्भातील समस्या, कॉलेज,शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, अथवा सरकार मार्फत शोषण, वाढीव फी, हॉस्टेल प्रश्न, शैक्षणिक कर्ज प्रकरणात अडथळे, बँकेकडून त्रास, आदीबाबत आवाज उठवणे, आंदोलन करणे, न्याय मिळवून देणे.


२) सध्याची शिक्षण पद्धत ही महागडी, संस्था चालकांचे खिसे भरणारी आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या समस्या जाणून घेऊन याबाबत अन्याय अत्याचार विरुद्ध सतत आवाज उठवणे. सीएचबी (तासिका तत्वावरील) भरती हे आरक्षण विरोधी, शोषण व्यवस्था असून याला विरोध करणे तसेच कायमस्वरूपी भरती बाबत अग्रेसर भूमिका मांडणे.


३) जीडीपीचा ६ % निधी शिक्षणावर खर्च सरकारने करावा यासाठी आवाज उठवणे, महगाई निर्देशांकानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सवलतीत वाढ करण्याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करून शासनाला धारेवर धरले पाहिजे. शिक्षक समायोजनेच्या नावाखाली हजारो शिक्षकांना वंचित ठेवण्याचा शासनाचा डाव हाणून पाडणे.


४) ग्रामीण भागात, खेडोपाडी, आदिवासी भागात जाऊन शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पालकांना सांगणे, जागरूक करणे, शिबिरे, बैठीक आयोजित करणे.


५) व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शुल्क वाढीबाबत आवाज उठवणे. सरकारचे खासगीकरण धोरण व आरक्षण विरोधी भूमिकेविरुद्ध आवाज उठवणे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमातून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, फ्रीशिप भाजप सरकारने बंद केली आहे ती पुन्हा सर्व अभ्यासक्रमासाठी सुरु करावी यासाठी लढा उभारणे. निर्वाह भत्ता, बेरोजगार भत्ता आदीबाबत आवाज उठवणे


६) शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण आजच्या तरुण युवक-युवतींनी रोखले पाहिजे. बेरोजगारी विरोधात सरकारला धारेवर धरणे. मंडळ आयोगाच्या अंमलबजावणी करिता जनजागृती करणे. मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजास ५% टक्के आरक्षण देण्यास सांगितले आहे त्याची अंमलबजावणी आजअखेर झालेली नाही. याबाबत जनजागृती करणे.७) या संघटनेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर तरुणांसाठी मार्गदर्शन, बेरोजगार मेळावा, शिबिरे आयोजित करणे. शिक्षण हक्क कायद्याच्या (RTE) प्रभावी अंमलबजावणी साठी लढा देणे .


८) फुले-शाहू-आंबेडकर यांनी शिक्षणाबाबत केलेले कार्य, भूमिका व सरकारची शिक्षणाबाबत, नोकऱ्याबाबतची ध्येय धोरण, निर्णय हे सामान्य विद्यार्थ्यापर्यंत पोहचवण्यासाठी लेख लिहिणे, प्रसिद्धी पत्रक काढणे, केडर कँम्प आयोजित करणे.


९) भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षण, सवलती, नोकरी हे अबाधित राहावे याकरिता अहोरात्र संघर्ष करणे. योग्य तो लढा देणे. नोकरी मधील शोषण, पगार बाबत तक्रारी , सरकारचे असंवैधानिक धोरण यावर आवाज उठवणे.


१०) उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह लक्षात घेत सोशल मिडिया, व इतर माध्यमातून माहिती पुस्तक, साहित्य, मासिका, वर्तमानपत्र, इतर लेखन साहित्य उपलब्ध करून देणे.


११) नवीन शैक्षणिक धोरण हे शिक्षणाचे बाजारीकरण, खासगीकरण करणारे आहे, विद्यार्थ्यांना व पालकांना याबाबत माहिती देऊन जनजागृती करणे.


१२) स्पर्धा परीक्षेच्या युगात विद्यार्थ्यांनी टिकून राहावे यासाठी व्यक्तीमत्व विकास शिबीर , स्पर्धा परीक्षा पुस्तके, मेळावे, लायब्ररी / ग्रंथालय आदीबाबत स्वत:कडून तसेच सरकार कडून योग्य ती मदत उपलब्ध करून देणे.१३) विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन, वादविवाद स्पर्धा, आदीबाबत विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे. चालू शैक्षणिक, राजकीय घडामोडी बाबत विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणे.


१४) राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यासाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम / उपक्रम राबविणे. पाली भाषा प्रत्येक विद्यापीठात सुरु करावी यासाठी आंदोलन करणे.


१५) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेची माहिती तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत पोहचवणे, सवलतीचा लाभ मिळवून देणे.


१६) समाज कल्याण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, विमुक्त जाती जमाती, ओबीसी आयुक्तालय, समाज कल्याण आयुक्तालय, बार्टी, जिल्हा परिषद आदी विभागाच्या विविध कार्यप्रणाली, आदेश/ जीआर अभ्यास करणे, पारदर्शक कारभार व प्रशासनाच्या गैरकारभार रोखण्याबाबत बाबत जागरूकता निर्माण करणे,वाचक निर्माण करणे.


१७) गेल्या काही वर्षापासून महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ यांच्या मार्फत देण्यात येणारे कर्ज आणि अनुदान कमी कमी होत आहे यावर सरकारचे लक्ष वेधणे


१८) कॉलेज / महाविद्यालय, विद्यापीठ, पदवीधर मतदार संघ, शिक्षक मतदार संघ आदी निवडणुकांमध्ये विद्यार्थ्याचा व संघटनेचा आवाज बुलंद करणे या प्रक्रियेत प्रामुख्याने सहभागी होणे.


१९) विद्यार्थी, तरुण तरुणी, बेरोजगाराना स्व:ताच्या पायावर उभे राहून व्यवसायात उतरावे यासाठी प्रोत्साहित करणे, मदत करणे, विविध व्यवसाय बाबत माहिती शिबिरे आयोजित करणे.


२०) समता, स्वतंत्रता, बंधुता, सामाजिक न्याय हे समाजामध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न करणे. प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री भाव तरुणांमध्ये निर्माण करणे. व्यसनाधीन तरुणांना वेसनातून बाहेर काढण्यासाठी वेसनमुक्ती कार्यक्रम, जनजागृती करावी.


२१) मुलींचा व महिलांचा सहभाग विद्यार्थी चळवळीत वाढविण्यासाठी भर देणे. सामाजिक अन्याय-अत्याचार विरुद्ध आवाज उठवणे.


२२) मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर शाळा, कॉलेज, विद्यापीठ मध्ये होणारे अन्याय अत्याचार रोखण्याबाबत अग्रेसर राहणे, रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी यांच्यासारखे अन्याय-अत्याचार पुन्हा कोणावर होऊ नये याकरिता सतत आवाज बुलंद करणे, आंदोलन करणे, सरकारचे याकडे लक्ष वेधून घेणे, रोहित अँक्ट पारित करण्यासाठी सरकारवर दबाव आणणे, गरज पडल्यास न्यायालयीन लढा उभारणे.


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतून सर्व भारतीयांना दिलेले समान हक्क व अधिकार, तसेच आरक्षण व सवलती, नोकऱ्या अबाधित राहावे याकरिता प्राण पणाला लावून कार्य करणे, बाबासाहेबांचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विचार याच्याशी प्रामाणिक राहून देश व समाज हिताचे काम करणे, गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी ही विद्यार्थी संघटना सतत कार्यशील राहील.


जिल्ह्याजिल्यातील शिक्षण क्षेत्रावर होणारा परिणाम लोकांच्या समोर उघड होत आहे, त्यातून असंतोष निर्माण होत आहे तो आता संघटीत करण्याची गरज आहे . रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. त्याशिवाय आता मार्ग राहिलेला नाही

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे , प्रत्येक नव्या पायरीवर संघर्ष करावाच लागेल अन् तो केला तरच पुढची पायरी गाठता येईल.


तरुण युवक-युवती, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी वर्गाने वरील बाबींवर लक्ष केंद्रित करून समाजाचे हित, न्याय हक्कांसाठी प्रयत्नशील राहून समाजाला योग्य ती दिशा द्यावी. यासाठी या जन आंदोलनात, न्याय हक्कांच्या लढाईत ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन या संघटनेत निष्ठावंत विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षक, प्राध्यापक, उच्च शिक्षित लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.

- अमोल वेटम, जनरल सेक्रेटरी, रिपब्लिकन स्टुडंट युनियन