रिंग्युइचोन वशुम
Indian activist micro credit in Ukhrul District | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | 20 century | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
रिंग्युइचोन वशुम ह्या मणिपूर राज्यातील उखरुल जिल्ह्यातील एक भारतीय कार्यकर्ते आहेत. ती महिला बचत गटांच्या निर्मितीला हातभार लावते. ती सूक्ष्म कर्ज पुरवठा करण्याचे काम कते. २०१७ मध्ये तिच्या कामासाठी तिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयुष्य
[संपादन]रिंग्युइचोन वशुम ह्या मणिपूर राज्यातील पार्टिसिपेटरी ॲक्शन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आहेत. ह्या संघटनेची स्थापना १९९७ मध्ये साली करण्यात आली.[१] २००७ मध्ये, वशुम यांनी मणिपूरच्या उत्तरेकडील उख्रुल जिल्ह्यातील, तांगखुल नागांचे वस्तीस्थान असलेल्या डोंगराळ भागातील महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली.[२]
ईशान्य प्रदेश समुदाय संसाधन व्यवस्थापन प्रकल्पाचा भाग म्हणून वशुम उख्रुल जिल्हा महिला सूक्ष्म-क्रेडिट संस्थेच्या (UDWIM) संचालक बनल्या.[२] तिची संस्था उखरुल जिल्ह्यात UDWIM अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गटांमधील महिलांना सूक्ष्म कर्ज देण्याचे काम करते. पूर्वी या प्रदेशातील महिला गांजा आणि अफूच्या पिकांची शेतीला प्राधान्य देत असत. वशुम यांनी या मदतीचा वापर महिलांना सेंद्रिय शेती आणि कुक्कुटपालन करण्याकडे प्रोत्साहित करण्यासाठी केला. यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. याशिवाय भरतकाम, अन्न प्रक्रिया आणि हातमाग विणकाम अशा इतर प्रकारच्या व्यवसासाठी देखील वशुम यांनी प्रोत्साहन दिले.[३]

२०१७ मध्ये जागतिक महिला दिनी वशुम यांना नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आमंत्रित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वर्षी २७ महिला आणि पाच संस्थांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[४] वशुम यांनी १३,००० हून अधिक महिला स्वयंसहाय्यता गटांना (स्वयंमदत गटांना) सक्षम बनवण्याचे काम केले अशी प्रशस्तीपत्रावर नोंद करण्यात आली.[३] पुरस्कार सोहळ्यात, वशुम यांनी दुसरी पुरस्कार विजेती महिला रीमा साठे यांना मणिपूर आणि त्याच्या दुर्गम गावांना भेट देण्यासाठी निमंत्रित केले. या प्रदेशात शाश्वततेची संकल्पना कशी रुजत आहे हे पाहून साठे प्रभावित झाल्या.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "About Us". Participatory Action For Sustainable Development Organisation (PASDO) (इंग्रजी भाषेत). 2024-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 February 2021 रोजी पाहिले.
- ^ a b c Sathe, Reema (5 June 2019). "How A Remote District In Manipur Is Taking Sustainability Beyond Lip Service". Forbes India (इंग्रजी भाषेत). 22 February 2021 रोजी पाहिले.
- ^ a b "Nari Shakti Puraskar citation". Ministry of Women and Child Development. 8 March 2017. 21 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Five Ngo's, 27 Women given Nari Shakti Award". Civil Society. 8 March 2017. 2021-09-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 February 2021 रोजी पाहिले.