रिंकी खन्ना
Indian actress | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | जुलै २७, इ.स. १९७७ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
वडील | |||
आई | |||
भावंडे | |||
| |||
![]() |
रिंकी खन्ना (जन्म रिंकल जतीन खन्ना; २७ जुलै १९७७) ही एक माजी भारतीय अभिनेत्री आहे.[१][२] ती अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि अभिनेता राजेश खन्ना यांची सर्वात धाकटी मुलगी आणि ट्विंकल खन्नाची बहीण आहे. अभिनेत्रीने आपले मूळ नाव रिंकलवरून बदलून रिंकी केले.
कारकीर्द
[संपादन]रिंकीने प्यार में कभी कभी (१९९९) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ज्यात डिनो मोरिया आणि संजय सूरी होते. चित्रपटातील गीत "मूसु मूसु हासी" प्रसिद्ध झाले जे गायक शंतनू मुखर्जी (शान) चे पहिले चित्रपट गीत होते. त्या नंतर तिने जिस देश में गंगा रहता है (२०००), मुझे कुछ कहना है (२००१) आणि चमेली (२००४) मध्ये सहाय्यक भूमिका केली होती.[३] २००१ मधील मजुनु ह्या तमिळ चलचित्रपटात तिने अभिनेता प्रशांत त्यागराजन सोबत मुख्य भूमीका केली होती जेव्हा डिंपल कपाडीयाला चित्रपटाची कथा आवडली होती. ती चित्रपटातील मुख्य नायकाच्या प्रेयसीची भूमिका साकारते, जो तिला दहशतवादी समजतो.[४] २००२ मध्ये, तिने अंकुर विकल आणि अतुल कुलकर्णी यांच्यासोबत मँगो सॉफ्ले चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली.[५]
वैयक्तिक जीवन
[संपादन]खन्ना यांचा जन्म २७ जुलै १९७७ रोजी मुंबई येथे अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या घरी झाला.[६] ती तिच्या पालकांची सर्वात लहान मुलगी आहे. तिची मोठी बहीण, ट्विंकल खन्ना, एक अभिनेत्री आहे. ट्विंकलचा विवाह अभिनेता अक्षय कुमार सोबत झाला आहे.[७]
खन्ना ने तिने मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयमध्ये शिक्षण घेतले आणि कम्युनिकेशनमध्ये बॅचलर पदवी पूर्ण करण्यासाठी बॉस्टनला गेली.
खन्ना यांनी ८ फेब्रुवारी २००३ रोजी उद्योगपती समीर सरन यांच्याशी लग्न केले आणि ते त्यांच्या पती आणि दोन मुलांसह लंडनमध्ये राहतात. तो मुळात कोलकात्याचा आहे. समीरच्या एमबीएच्या अभ्यासादरम्यान, ती त्याच्यासोबत स्वित्झर्लंडमध्ये राहिली.[८]
चित्रपटांची यादी
[संपादन]वर्ष | चित्रपट | भूमिका | टिप्पणी |
---|---|---|---|
१९९९ | प्यार में कभी कभी | खुशी | |
२००० | जिस देश में गंगा रहता है | टीना | |
२००१ | मुझे कुछ कहना है | प्रिया सलुजा | |
मजुनु | हीना | तमिळ चलचित्रपट | |
२००२ | ये है जलवा | रिंकी मित्तल | |
मँगो सॉफ्ले | किरण | ||
२००३ | प्राण जाये पर शान ना जाये | सुमन | |
झंकार बीट्स | निकी | ||
२००४ | चमेली | नेहा |
पुरस्कार
[संपादन]- २०००: सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी झी सिने पुरस्कार - प्यार में कभी कभी (विजयी)
- २०००: सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेर पुरस्कार - प्यार में कभी कभी (नामांकित)
संदर्भ
[संपादन]- ^ "Meet Rinke Khanna's Daughter Naomika (All Smiles With Nani Dimple Kapadia)". NDTV.com. NDTV. 17 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "Twinkle Khanna and Dimple Kapadia spotted outside a salon but who is this cutie with them? Bollywood News". timesnownews.com. Times Now. 25 March 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 March 2019 रोजी पाहिले.
- ^ Khanna, Rinke (4 October 2000). साचा:Citation/make link. Interview with Lata Khubchandani. Mumbai: Rediff. https://www.rediff.com/entertai/2000/oct/04rinke1.htm.
- ^ "Rinke Khanna tries her luck in South : Down South News : ApunKaChoice.Com". 10 April 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-04-12 रोजी पाहिले.
- ^ "Bollywood poised for big leap with clutch of bold movies on alternative sexuality". India Today.
- ^ "Twinkle Khanna pens goofy birthday wish for sister Rinke Khanna: 'May you never have to deal with fools, except me'". 27 July 2023.
- ^ "Rediff On The Net, Movies: Fresh 'n' friendly". Rediff.com. 10 July 1999. 4 October 1999 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Family ties above family business". The Telegraph (India). 12 November 2021 रोजी पाहिले.