रासायनिक प्रक्रिया अभियांत्रिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रासायनिक प्रक्रिया आभियांत्रिकी या पानावरून पुनर्निर्देशित)

रासायनिक प्रक्रिया आभियांत्रिकी अथवा केमिकल रिऍक्शन इंजिनिअरिंग ही रासायनिक आभियांत्रिकी मध्ये शिकवली व वापरली जाणारी महत्त्वाची शाखा आहे. या मध्ये मुख्यत्वे रासायनिक प्रक्रिया त्यांचा अभ्यास त्या कश्या प्रकारे औद्योगिक स्तरावर अथवा छोट्या स्तरावर वापरता येईल याचा अभ्यास असतो. या विषयाला विकसित करण्याचे श्रेय मुख्यत्वे ऑक्टेव लेवेनस्पील यांना जाते.

जेव्हा वेगळि दोन अथवा अधिक रसायने एकत्र येउन नवे रसायन -(ने) बनते (तात) किंवा एखाद्या रसायनाचे अनेक रसायनात किंवा मुलतत्त्वात बदलते किंवा बनवतात तेव्हा त्या क्रियेला रासायनिक क्रिया असे म्हणतात. उदा: हायड्रोजन व ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्याचे पाणी बनते. या विरुद्ध पाण्याचे सुद्धा हायड्रोजन व ऑक्सिजन मध्ये विघटन होउ शकते. जेव्हा वेगळि दोन अथवा अधिक रसायने एकत्र येउन नवे रसायन -ने बनते किंवा एखाद्या रसायनाचे अनेक रसायनात किंवा मुलतत्त्वात बदलते किंवा बनवतात तेव्हा त्या क्रियेला रासायनिक क्रिया असे म्हणतात. उदा: हायड्रोजन व ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्याचे पाणी बनते. या विरुद्ध पाण्याचे सुद्धा हायड्रोजन व ऑक्सिजन मध्ये विघटन होउ शकते. अश्या हजारो क्रियांचा रसायन शास्त्रामध्ये वापर होतो अथवा अभ्यास होतो. रासायनिक आभियांत्रिकीच्या या शाखेत मुख्यत्वे अश्या क्रियांचा अभ्यास होतो. या क्रिया घडायला किती वेळ लागतो, क्रियेचा वेग किती आहे, या क्रिया कोणकोणत्या गुणधर्मांनी प्रभावित होतात. त्यांचा वेग वाढवण्यासाठि कोणत्या उपाय-योजना कराव्यात या सगळ्यांचा बारकाईने अभ्यास होतो व अश्या क्रियांची औद्योगिक स्तरावर रचना केली जाते.