Jump to content

राम जेठमलानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राम जेठमलानी (जन्म : शिखरपूर, सिंध प्रांत, पाकिस्तान, १४ सप्टेंबर १९२३; - नवी दिल्ली, ८ सप्टेंबर २०१९) हे भारतीय वकील आणि संसदसदस्य होते. कायद्याची पदवी मिळवल्यानंतर जेठमलानी यांनी सिंधमध्ये वकिली केली. भारताच्या फाळणीनंतर त्यांनी मुंबईला स्थलांतर केले.

जेठमलानी हे जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. भाजपच्या सरकारमध्ये हे भारताचे कायदेमंत्री तसेच नागरी विकासमंत्री होते.

त्यांची मुले महेश जेठमलानी आणि राणी जेठमलानी हीसुद्धा वकील आहेत.