राम कापसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राम कापसे (जन्म: डिसेंबर १, इ.स. १९३३) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. २००४ ते इ.स. २००६ या कालावधीत अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल होते. तसेच भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये महाराष्ट्र राज्यातील ठाणे मतदारसंघातून लोकसभेवर तर इ.स. १९८५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. तसेच इ.स. १९९६ ते इ.स. २००० या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.