रामेश्वरी (अभिनेत्री)
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| जन्म तारीख | ६ जानेवारी 1958 |
| जन्मस्थान | आंध्र प्रदेश |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | तेलुगू भाषा |
| व्यवसाय | अभिनेता, दूरदर्शन अभिनेता |
| पुरस्कार | नंदी पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण |
तल्लुरी रामेश्वरी (६ जानेवारी, १९५८)एक तेलुगु आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. तिने दूरचित्रवाणी मालिकेत देखील काम केले आहे.
तिने प्रथम पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थैत अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि मग हिंदी चित्रपटांमध्ये कामास सुरुवात केली. त्यानंतर तिने के. विश्वनाथ दिग्दर्शित 'सीतामलक्ष्मी' (१९७८) या चित्रपटात काम केले आणि ती तेलुगूमध्ये प्रसिद्ध झाली. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि तिच्या अभिनयाबद्दल तिला सरकारकडून सन्मानित करण्यात आले. नंतर तिने 'मंगलाथोरनालू' या चित्रपटात काम केले . त्यानंतर तिने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले. 'सुनयना' या चित्रपटात काम करत असताना तिचा अपघात झाला आणि तिच्या डोळ्याला दुखापत झाली. अलीकडेच, तिने ' नियम' या तेलुगू चित्रपटात महेश बाबूच्या आईची एक गुंतागुंतीची भूमिका साकारली.
पूर्वायुष्य आणि कारकिर्द
[संपादन]रामेश्वरीच्या आई-वडिलांचे मूळ गाव पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील लंकालाकोडेरू आहे. तथापि, रामेश्वरीचा जन्म नेल्लोर येथे झाला. रामेश्वरीने नववीपर्यंतचे शिक्षण काकीनाडा येथे घेतले. पुढे तिच्या वडिलांच्या व्यवसायामुळे त्यांचे कुटुंब तिरुपती येथे स्थायिक झाले. तिरुपतीमध्ये असताना, रामेश्वरी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाने मोहित झाली आणि तिने चित्रपटसृष्टीत सामील होण्याचा निर्णय घेतला. रामेश्वरीची मोठी बहीण तल्लुरी शांताकुमारी डॉक्टर झाली. शिक्षणात रस नसलेल्या रामेश्वरीने चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याच्या उद्देशाने पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश केला. पदवी पूर्ण न करताच चित्रपटसृष्टीत सामील झाल्यास आपल्या मुलीचे भविष्य काय असेल याबद्दल तिच्या वडिलांना सुरुवातीला थोडी चिंता वाटत होती. पण जेव्हा तिच्या मोठ्या बहिणीने, जी आधीच एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात होती, चित्रपटसृष्टीत योग्य संधी न मिळाल्यास तिला पाठिंबा देण्याचे वचन दिले, तेव्हा तिचे वडील काहीसे नरमले.
अभिनयाची कारकीर्द
[संपादन]राजश्री फिल्म्सने त्यांच्या नवीन चित्रपटासाठी नवीन कलाकारांच्या शोधात वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली. रामेश्वरीने अर्ज केला आणि 'दुल्हन वही जो पिया मन भाये' (१९७७) या चित्रपटात नायिका म्हणून तिची निवड झाली. पुढे त्यांनी के विश्वनाथ यांच्या सीतामालक्ष्मी या तेलुगू चित्रपटात १९७८ साली काम केले आणि फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार (तेलुगू) हा पुरस्कार मिळवला.[१]
पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तिची भेट पंजाबी अभिनेते आणि निर्माते दीपक सेठ यांच्याशी झाली आणि तिने त्यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर रामेश्वरी मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांना १७ आणि १४ वर्षांचे दोन मुलगे आहेत.[२] रामेश्वरी आणि त्यांच्या पतीने २००७ मध्ये "मैं तू अस्सी तुस्सी" या पंजाबी चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या "द कॉमेडी ऑफ एरर्स" या नाटकावर आधारित आहे.[३] पंजाबी चित्रपटसृष्टीतील आणखी एक महत्त्वाचा चित्रपट, 'चन्ना परदेसी', याची निर्मिती देखील रामेश्वरी आणि सेठ यांनी केली होती. या व्यतिरिक्त त्यांनी ओडिया आणि मल्याळम भाषेतील चित्रपटात देखील काम केले.
अभिनय सूची
[संपादन]चित्रपट
[संपादन]| वर्ष | चित्रपट | भूमिका | भाषा | नोंद |
|---|---|---|---|---|
| १९७७ | दुल्हन वही जो पिया मन भाये | कम्मो | हिंदी | |
| १९७८ | सीतामालक्ष्मी | सीतामालक्ष्मी | तेलुगू | फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार (तेलुगू) |
| मेरा रक्षक | बिजली | हिंदी | ||
| १९७९ | मंगल थोरानालू | तेलुगू | ||
| सुनयना | सुनयना | हिंदी | ||
| १९८० | आशा | माला | हिंदी | नामांकित–फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार (सहाय्यक) |
| मान अभिमान | हिंदी | |||
| साजन मेरे मै साजन की | हिंदी | |||
| १९८१ | अग्नी परिक्षा | मीता | हिंदी | |
| शारदा | शारदा | हिंदी | ||
| २९८२ | आदत से मजबूर | सलमा/शांती | हिंदी | |
| वक्त वक्त की बात | हिंदी | |||
| १९८३ | कालका | कजरी | हिंदी | |
| १९८४ | एक नया इतिहास | हिंदी | ||
| मान मर्यादा | पूजा | हिंदी | ||
| १९८५ | मुझे कसम है | हिंदी | ||
| ओनाथुम्बिक्कोरूंजाल | ग्रेसी | मल्याळम | ||
| मानिनी | ओडिया | |||
| १९८६ | भाई का दुश्मन भाई | हिंदी | ||
| १९८७ | भुली हुएना | ओडिया | ||
| १९८८ | प्यारी भाभी | हिंदी | ||
| हम फरिश्ते नहीं | कोमल | हिंदी | ||
| चरनो की सौगंध | गायत्री | हिंदी | ||
| चिन्नोदु पेड्डोदु | तेलुगू | |||
| २००२ | कुछ तुम कहो कुछ हम कहे | शांती | हिंदी | |
| २००३ | निजाम | शांती | तेलुगू | नंदी सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार (सहाय्यक) नामांकन – फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार (तेलुगू) |
| २००५ | बंटी और बबली | मिसेस त्रिवेदी | हिंदी | |
| अर्जुन | आई | ओडिया | ||
| २००६ | नंदनवनम १२० किमी | तेलुगू | ||
| २०११ | फालतू | हिंदी | ||
| संकाल - द लॅच | हिंदी | |||
| २०१४ | राउडी फेलो | तेलुगू | ||
| २०२४ | देवरा १ | जोगुला | तेलुगू | |
| २०२५ | ब्रम्हा आनंदम् | समरला ज्योती | तेलुगू | |
| उप्पू कप्पुरंबु | कोंडम्मा | तेलुगू |
मालिका
[संपादन]- अमेरिका अम्माई
- कैरी
- मितवा फूल कमल के
- जब लव हुआ
- बाबूल का आंगन छूटे ना
- पडोसी (१९८५)
- चमत्कार
- आडोस पडोस (टीव्ही मालिका)
- नन्ही सी कली मेरी लाडली (डीडी नॅशनलवर प्रसारित टीव्ही मालिका)
- झाशी (२०२२-२०२३) (डिझ्नी+ हॉटस्टार)
- कुमारी श्रीमती (ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ)
- गणदेवता (१९८७-१९८८) (दूरदर्शन)
संदर्भ
[संपादन]- ↑ "Movie Listings: Seetamalakshmi | eTimes", The Times of India, 2022-07-30 रोजी पाहिले
- ↑ The Hindu: Metro Plus Hyderabad / Cinema : Once upon a star
- ↑ "Audio CD of "Main Tu Assi Tussi" released". The Tribune, Chandigarh, India. 2026-09-07 रोजी पाहिले.