Jump to content

रामलीला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामलीला सादर करणारे कलाकार

रामलीला हे युनेस्कोने जाहीर केलेल्या अमूर्त वारसा यादीतील एक नृत्य नाट्य आहे .[] शारदीय नवरात्री काळातील नऊ दिवसात याचा रंगमंचीय आविष्कार सादर केला जातो . गावागावातून याचे सादरीकरण केले जाते . हे सादरीकरण करणारे कलाकार स्थानिक असतात आणि नऊ दिवसात भगवान प्रभू श्रीराम यांच्या चरित्रातील विविध घटना सादर केल्या जातात . विजयादशमी म्हणजे दसरा या दिवशी रावणाचा वध आणि रावणदहन केले जाते . हे खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात आणि आनांद घेतात .

स्वरूप

[संपादन]

गोस्वामी तुलसीदास यांच्या श्रीराम करीत मांस या ग्रंथाच्या प्रभावामुळे रामलीला या नृत्यनाट्य संकल्पनेला मूर्त स्वरूप आले असे मानले जाते . प्रत्येक दिवशी राम चरित्रातील एक एक कथानक घेऊन त्यावर नृत्य नाट्य सादर केले जाते .


अभ्यास

[संपादन]

रामलीला सादरीकरणासाठी सम्वाद लिहिताना भारतातील विविध रामायणाचा अभ्यास केला जातो . रामचरित मानस , कम्ब रामायण , दर्पण रामायण , गोविंद रामायण ,रावण संहिता अशा ग्रंथांचा अभ्यास करून त्यानंतर संहिता लेखन केले जाते .

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "From Yoga to Ramlila: 7 UNESCO Intangible Cultural Heritage elements in India". 2025-07-10. ISSN 0971-8257.