रामधारीसिंह दिनकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामधारीसिंह दिनकर
जन्म नाव रामधारीसिंह दिनकर
जन्म २३ सप्टेंबर, इ.स. १९०८
सिमरीया, जि. मुंगेर (बिहार)
मृत्यू २५ एप्रिल, इ.स. १९७४
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९६०)
ज्ञानपीठ पुरस्कार
पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९५९)

रामधारीसिंह दिनकर (जन्म - २३ सप्टेंबर, इ.स. १९०८ मृत्यू - २५ एप्रिल, इ.स. १९७४) हे साहित्यकार होते.

परिचय[संपादन]

रामधारीसिंह दिनकर यांनी इ.स. १९३२ साली पटना विश्वविद्यालयातून इतिहास विषयात बी.ए. (ऑनर्स) ही पदवी घेतली. इ.स. १९३४ ते इ.स. १९४२ पर्यंत बिहार सरकारच्या अखत्यारीतील एका संस्थेत सब रजिष्ट्रार या पदावर कार्य केले. इ.स. १९४३ ते इ.स. १९४९ या कालावधीत माहिती विभागात नोकरी केली. रामधारीसिंह दिनकर हे इ.स. १९५२ ते इ.स. १९६४ या कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते. इ.स. १९६५ मध्ये ते भागलपूर विश्वविद्यालयाचे कुलपती बनले व त्यानंतर एका वर्षाने भारताच्या केंद्र सरकारचे हिंदी सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले.

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • 'कुरूक्षेत्र' साठी साहित्यकार संसद (अलाहाबाद) पुरस्कार (इ.स. १९४८)[१]
  • नागरी प्रचारिणी सभेचे द्विवेदी पदक (दोन वेळा)
  • 'उर्वशी'साठी उत्तरप्रदेश सरकारचा पुरस्कार
  • नागरी प्रचाारिणी सभेचा रत्नाकर पुरस्कार
  • 'संस्कृति के चार अध्याय' यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९६०)
  • पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९५९)
  • भागलपूर विद्यापीठाची डि.लीट ही मानद उपाधी (इ.स. १९६१)
  • 'उर्वशी'साठी ज्ञानपीठ पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "१९५९ रामधारीसिंह दिनकर" (इंग्रजी मजकूर). १ मे, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 


बाह्यदुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.