रामचंद्र कृष्णाजी फाटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक (२१ ऑक्टोबर, इ.स. १९१७ - २६ सप्टेंबर, इ.स. २००२) मराठी गायक, संगीतकार होते.

जीवन[संपादन]

रामभाऊंचे क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच त्यांनी पुण्यात राहून ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले. बालगंधर्वानी नाटक कंपनीत येण्याचे निमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी नकार दिला. नोकरी करत असतानाही त्यांची संगीताची ओढ कमी झाली नव्हती. १९४५ मध्ये एचएमव्हीने त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली आणि रामभाऊंना आपले सुखनिधान सापडले.

शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे इ.स. १९५६ पासून पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोले आणि जे.एल. रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली.

इ.स. १९७२ साली त्यावेळचे नवोदित गीतकार सुधीर मोघे ह्यांच्या 'सखी मंद झाल्या तारका' ह्या गीताला राम फाटकांनी स्वरबद्ध करून भीमसेन जोशी ह्यांच्याकडून हे गाणे गाऊन घेतले. पुढे हे गाणे ध्वनीफितीद्वारे सुधीर फडक्यांच्या स्वरात प्रकाशित करण्यात आले.

रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील 'तीर्थ विठ्ठल', 'माझे माहेर पंढरी', 'पंढरी निवासा', 'अणुरेणीया थोकडा' हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच 'दिसलीस तू', 'डाव भांडून मांडून मोडू नको' आणि 'सखी, मंद झाल्या तारका' ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली.

राम फाटक यांचे संगीत असलेली काही गाणी[संपादन]

  • अणुरेणिया थोकडा
  • अंतरीच्या गूढ गर्भी
  • अधिक देखणें तरी
  • अबीर गुलाल उधळीत
  • आता कोठे धावे मन
  • आम्हां नकळे ज्ञान
  • आरंभी वंदीन अयोध्येचा
  • ऊर्मिले त्रिवार वंदन तुला
  • काया ही पंढरी आत्मा
  • घडी घडी घडी चरण तुझे
  • जातां पंढरीस सुख वाटे
  • ज्याचा सखा हरी
  • झुंजता रणभूवरी तू
  • डाव मांडून भांडून
  • तपत्या झळा उन्हाच्या
  • तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
  • दिसलीस तू फुलले ॠतू
  • नामाचा गजर गर्जे
  • पावलों पंढरी वैकुंठभुवन
  • पुण्य पर‍उपकार पाप ते
  • पंढरी निवासा सख्या
  • पंढरीचे सुख नाहीं
  • पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
  • मन लोभले मनमोहने
  • माझा भाव तुझे चरणी
  • माझे माहेर पंढरी
  • रसिका तुझ्याचसाठी
  • राम नाम ज्याचें मुखी
  • रामाचें भजन तेंचि
  • विठ्ठल गीतीं गावा
  • सखी मंद झाल्या तारका
  • सगुणाची सेज निर्गुणाची
  • सुखाचें हें नाम आवडीनें
  • संतभार पंढरीत
  • हे नायका जगदीश्वरा
  • ज्ञानियांचा राजा

आत्मचरित्र[संपादन]

रामभाऊ फाटक यांनी 'स्वरयात्रा' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.