राजाभाऊ खोब्रागडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजाभाऊ खोब्रागडे

कार्यकाळ
१७ डिसेंबर, इ.स. १९६९ – २ एप्रिल, इ.स. १९७२
मागील व्हायलेट अल्वा
पुढील गोदे मुरहरी

राज्यसभेचे सदस्य (महाराष्ट्रातून)
कार्यकाळ
३ एप्रिल, १९५८ – २ एप्रिल, १९८४

जन्म २५ सप्टेंबर १९२५ (1925-09-25)[१]
चंद्रपूर, महाराष्ट्र
मृत्यू ९ एप्रिल, १९८४ (वय ५८)
राजकीय पक्ष  • अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष
 • [[:en:Republican Party of India
All Indian Republican Party

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष]]

आई इंदिराबाई खोबरागडे
वडील देवाजी खोबरागडे
पत्नी इंदुबाई खोबरागडे
शिक्षण बॅरिस्टर (Bar-at-law) London

भाऊराव देवाजी खोब्रागडे (२५ सप्टेंबर १९२५ - ९ एप्रिल १९८४) हे सामान्यत: राजाभाऊ खोब्रागडे म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय बॅरिस्टर, आंबेडकरी समाजसेवक आणि राजकारणी होते. १९५८ ते १९८४ पर्यंत ते विविध वेळी भारतीय संसदेच्या राज्यसभा सदनाचे सदस्य होते. इ.स. १९६९ ते इ.स. १९७२ पर्यंत ते राज्यसभेचे उपसभापती होते.[२] खोब्रागडे हे आंबेडकरवादी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे नेते होते.[३][४][५] ते महार (अनुसूचित जाती) समुदायात जन्मले होते आणि १९५६ मध्ये भारतीय घटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[३][४][६]

खोब्रागडे यांचे प्रारंभिक शिक्षण चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी इ.स. १९४३ मध्ये नागपूर विज्ञान महाविद्यालयातून इंटर सायन्स आणि १९४५ मध्ये मॉरिस कॉलेज, नागपूर येथून बीएची पदवी मिळवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सल्ल्यानुसार ते १९५० मध्ये लंडन येथील लिंकन कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेले. डॉ. आंबेडकर यांनी लंडनला अभ्यासासाठी पाठवलेल्या १६ विद्यार्थ्यांपैकी ते एक होते परंतु ते स्वतःचा खर्च घेऊन लंडनला गेले होते व बाकीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी होते.[६]

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे, जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे आणि त्याचे नेते खोब्रागडे यांच्या नावावरून आहे. बॅरिस्टर राजाभाऊ यंचे नातू राजस खोबरागडे है त्यांचे कार्य पुढे नेण्याच कार्य करीत आहेत. ref name="auto2"/>[४]

सन्मान[संपादन]

भारतीय डाकने २००९ मध्ये खोब्रागडे यांना समर्पित एक टपाल तिकिट काढले होते.[७][८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Remembering Rajabhau Khobragade, a revolutionary leader. Round Table India.
  2. ^ "Biographical Sketches of Deputy Chairman of Rajya Sabha" (PDF). p. 1.
  3. ^ a b "Khobragade faction of RPI supports NDA | Nagpur News - Times of India". The Times of India.
  4. ^ a b c "रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा संकल्प बाबासाहेबांचाच | eSakal". www.esakal.com.
  5. ^ "Dr Ambedkar and Politics of Caste - Mainstream Weekly". www.mainstreamweekly.net.
  6. ^ a b https://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=9349:remembering-rajabhau-khobragade-a-revolutionary-leader&catid=127:post-ambedkar-leaders&Itemid=158
  7. ^ "WNS: IN082.09 (Rajabhau Khobragade)". www.wnsstamps.post.
  8. ^ "Postage Stamps:: Postage Stamps,Stamp issue calender 2014, Paper postage, Commemorative and definitive stamps, Service Postage Stamps, Philately Offices, Philatelic Bureaux and counters, Mint stamps (unused stamps)". postagestamps.gov.in. Archived from the original on 2019-11-21. 2020-07-26 रोजी पाहिले.